|श्री स्वामी समर्थ|
२३ डिसेंबर २०१५ सकाळी ११:३० ची निवांत वेळ. रोजची पूजा वगैरे झालेली होती. छान नाश्ता सुधा झालेला. अगदी भरपेट. मस्त गरम गरम चहा सोबत वर्तमात पत्र वाचत होतो. मंदारचा फोन.
गडी चांगलाच त्रासलेला होता. एका अत्यंत नामांकित आयटी कंपनीत तो कामाला होता. रग्गड पगार. परदेशी जाण्याची संधी. वेळोवेळी झालेली प्रमोशन्स वगैरे वगैरे. त्याचा पूर्व इतिहास माझ्या डोळ्यासमोरून झरकन सरून गेला. मी म्हटलं,एवढं त्रासायला काय झालं असावं? तर असे आहे महाराजा ! त्याचा प्रोजेक्ट ३१ तारखेला संपणार होता आणि स्वारी बेंच वर जाणार होती. ३१ तारखेच्या आधी नवीन प्रोजेक्ट ची शोधा शोध त्याला करायची होती. काहीतरी जुगाड (त्याच्या भाषेत) करणे आवश्यक होते. जर मनासारखे प्रोजेक्ट नाही मिळाले तर १ जानेवारी पासून एच आर ला रिपोर्ट करावे लागणार. पगारात कपात होणार. महिन्याचे बजेट गडबडणार. असे बरेच काही. डोक्यावर तलवारच म्हणायची. भाई बऱ्यापैकी टेन्शन मध्ये होता. काही दिवसापूर्वी त्याने त्याच कंपनीत दुसऱ्या एका प्रोजेक्ट साठी मुलाखत दिली होती. पण त्यांच्याकडून त्याला काहीच बातमी मिळाली नव्हती. ते प्रोजेक्ट त्याच्यासाठी सोयीचे होते. त्याची अशी इच्चा होती कि त्या प्रोजेक्ट मध्ये त्याचे सिलेक्शन व्हावे. पण समज नाहीच झाले तर दुसरी व्यवस्था करणे गरजेचे होते. वेळाही तसा कमीच होता. जास्त पाल्हाळ न लावता मी म्हटलं १ ते २४९ मधला एखादा नंबर दे पटकन. त्याला हे हि सांगितले लकी नंबर, घराचा, गाडीचा नंबर, बायकोचा मुलाचा वाढ दिवस वगैरे असा नंबर द्यायचा नाही. मनात एखादा तत्क्षणी आलेला नंबर दे. हे यासाठी कि असे प्रश्न प्रश्न कुंडलीवरून सोडवायचे असतात. २३/१२/२०१५ सकाळी ११:५४ मि. त्याने १२९ नंबर दिला. हा प्रश्न वसई येथे घेतला. लगेच प्रश्न कुंडली बनवून घेतली. ती खाली दिलेली आहेच.

प्रश्न असा आहे कि अपेक्षित बातमी मिळेल का? ती सकारात्मक असेल का? अशी बातमी कधी मिळेल?
त्याबद्दलचा नियम असा कि तृतीय भावाचा उपनक्षत्र स्वामी लाभाचा कार्येश असेल तर अपेक्षित बातमी मिळेल तसेच लाभाचा उपनक्षत्र स्वामी तृतीयाचा कार्येश असेल तर बातमी सकारात्मक असेल. कालनिर्णयासाठी तत्कालीन ग्रह सारणी विचारात घ्यावी लागेल. (Ruling Planet)
तत्कालीन ग्रह खालील प्रमाणे
लग्न (L) : कुंभ. स्वामी शनी.
चंद्र नक्षत्र (S): कृत्तिका. स्वामी रवि.
चंद्र राशी (R): शुक्र. स्वामी शक्र.
वार (D): बुधवार. स्वामी बुध.
तृतीय भावाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र आहे तो ३, ८, ११ व १० ह्या भावांचा कायेश होतो. म्हणजे अपेक्षित बातमी नक्की मिळेल पण ती बातमी थोडी तापदायक असू शकते. कदाचित काही तडजोड करावी लागेल ती हि मनाविरुद्ध. कारण चंद्र अष्टमाचा कार्येश होतो आहे. लाभाचा उपनक्षत्र स्वामी राहू ३,११,१२ व ९ ह्या भावांचा कार्येश होतो आहे म्हणजे बातमी positive असेल. आता प्रश्न असा निर्माण होतो कि हि बातमी कधी मिळेल? हि बातमी साधारण आठवडा भारत अपेक्षित आहे म्हणून तत्कालीन ग्रहांची मदत घेतली. नियम असा कि प्रश्न वेळेच्या तत्कालीन ग्रहांच्या राशीतून आणि नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण होते तेव्हा घटना घडते. त्यावेळेचे पंचांग बघितले तर असे दिसते कि प्रश्न वेळी चंद्र वृषभ राशीत आहे त्यानंतर तो मिथुन राशीत जाइल. मिथुन राशीचा स्वामी बुध तत्कालीन ग्रह सारणीत आहे. मिथुन राशीत कोणती नक्षत्रे आहेत? मृग (स्वामी मंगळ), आर्द्रा (स्वामी राहू), पुनर्वसु (स्वामी गुरु). मंगळ, राहू आणि गुरु हे तत्कालीन ग्रह सारणीत नाहीत म्हणजे चंद्र मिथुन राशीत असताना बातमी मिळणार नाही. मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाइल. कर्क राशीचा स्वामी चंद्र तत्कालीन ग्रह सारणीत नाही. म्हणजे चंद्र कर्क राशीत असताना सुद्धा बातमी मिळणार नाही. त्यानंतर चंद्र सिंह राशीत जाइल. सिंह राशी स्वामी रवि तत्कालीन ग्रह सारणीत आहे. सिंह राशीत माघा हे केतूचे, पूर्वाफाल्गुनी हे शुक्राचे आणि उत्तराफाल्गुनी हे रविचे नक्षत्र आहे. शुक्र तत्कालीन ग्रह सारणीत राशी स्वामी म्हणून आहे व रवि नक्षत्र स्वामी म्हणून आहे. येथे राशी स्वामी प्राधान्याने विचारात घेतला म्हणजे चंद्र सिंह राशीत शुक्राच्या नक्षत्रात असताना बातमी मिळेल. पंचांग बघितले असता असे समजते कि दिनांक ३१ डिसेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ५ वाजून २९ मि. पर्यंत चंद्र पु. फाल्गुनी ह्या शुक्राच्या नक्षत्रात आहे. म्हणून असे सांगितले कि अपेक्षित बातमी ३१ डिसेंबरला संध्याकाळी ५:३० च्या आत येईल.
हे सर्व ऐकून मंदार राव थोडे माणसात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने सागितले कि ३१ तारखेला दुपारी २:३० वाजता त्याला 'तिकडून' फोन आला आणि १ जानेवारीपासून join करायला सांगितले. तडजोड अशी कि त्याला रात्र पाळी करावी लागेल जी त्याने गेल्या ४-५ वर्षात केली नव्हती.
मी मनातल्या मनात गुरुवर्य श्री. कृष्णामुर्तींना नमस्कार केला. शेवटी स्वामी वचन आहे राव. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
||श्री स्वामी समर्थ | जय जय श्री स्वामी समर्थ ||
#Short_story, #marathi_katha, #katha, #story, #from_amod, #amod, #nanavare, #amodnanavare, #marathi-katha, #marathi, #Maay-marathi, #Maaymarthi, #mangya, #breakup, #love, #mangyache_break_up, #short_stories, #marathi, #short_Stories,#Dustbin, #Kachara_Kundi, #India, #Short_Story_Dustbin, #KP_Astrology, Krishnamurthi_Paddhati, #KP, #Home, #Property, #Bhavishya, #Astro_Amod_Nanavare, #Desired_Property, ##My_Home, #Indian_Astrlogy, #Indian_Astro, #Astroloty_India, #Will_get_that_property?, #When_will_the_Light_resume, #Electricity, #lait_kadhi_yeil?, #apekshit_batami, #Expected_news, #news, #When_will_I_get_the_expected_news?,