Friday, January 5, 2018

शुक्र ग्रह : तपासा आपला कुंडलीतला शुक्र


आपण सगळे आज अर्थार्थी आहोत नाही का? एखादी व्यक्ती देवळात जाते आणि काय मागते? सुख! आपण सुख कशात पाहतो? बँकेत बऱ्यापैकी रोकड असावी. ६ आकडी पगार असावा. सुंदर, सुशील, घरेलू वगैरे अशी बायको असावी. दोन गोंडस मुल. वेळ प्रसंगी मदतीला येणारे मित्र. एक flat. एखादा मस्त सेकण्ड होम निसर्गाच्या कुशीत... wow. आयुष्याच्या मध्यावरहि आरोग्याचा वरदहस्त. थोडक्यात काय तर सुख आणि समृद्धी. ऐश्वर्य आणि प्रसिद्धी. ह्यासाठी कुंडलीतले शुक्राचे स्थान अतिशय महत्वाचे ठरते.

अनेक प्रकारचे भोग विलास, प्रेम, सौंदर्य, संगीत, कला, सर्व प्रकारच्या सुख सुविधा, शांती, लैंगिकता, वैवाहिक सुख, शय्या सुख आणि बऱ्याच गोष्टींचे कारकत्व शुक्राकडे जाते. वृषभ आणि तुला राशीचा स्वामी शुक्र मीन राशीत उच्च आणि कन्या राशीत नीच मनाला जातो. सप्तम भावाचा कारक शुक्र स्वतः पासून सातव्या भावात पूर्ण दृष्टीने पहातो. शुक्राची दृष्टी हि शुभकारक मानली जाते. रवी व चंद्र हे शुक्राचे नैसर्गिक शत्रू असून शनी बुध हे मित्र मानले जातात तर गुरु -मंगळ यांच्याशी शुक्राचे समत्व असते. 

कुंडलीत शुभ शुक्र असता स्त्री - पुरुषाचे व्यक्तिमत्व विशेष आकर्षक असते. काळेभोर सुंदर डोळे, लांब सडक केस, तेज:पुंज कांती असते. जातक धनवान आणि समृद्ध असतो. साहित्य, संगीत, कला, चित्रपट, अभिनय इ विषयात रुची आणि प्राविण्य असते. शुभ शुक्र असता जातक ऐश आरामाचे जीवन जगतो. रसिक असतो. उत्कट प्रेम संबंध असतात. मानवी शरीरात शुक्र गुप्तांगाचा, शुक्राणूचा  व महिलांच्या बाबतीत प्रजनन संबंधी अवयवांचा कारक असतो. पुरुषांच्या कुंडलीत शुक्र स्त्री सुखाचा कारक असतो. शुभ  शुक्र संबंधित दशा अंतर्दशा काळात जातकास अनेक संसारिक लाभ होतात. वाहन सौख्य, वस्त्रालंकार, आभूषण, मान- सन्मान, पदोन्नती, उत्साह, लक्ष्मी कृपा, कन्या संतती, 

जन्म लग्न कुंडलीत शुक्र नीच राशीत, शत्रू गृही, अस्तंगत, बलहीन, स्तंभी, अशुभ ग्रह दृष्ट, पाप ग्रहाच्या युतीत, प्रतियोगात, पाप कर्तरी योगात असता अशुभ फळ देतो. वीर्यदोष, गुप्तरोग, प्रमेह, पंडुरोग, मूत्रविकार, श्वेतप्रदर, कामान्धता इ रोग निर्माण करतो. 

सर्व प्रकारचे शुभ्र पदार्थ उदा. साखर, चांदी, दुध, दुग्ध पदार्थ, तांदूळ, सुगंधित द्रव्य, अत्तर, दागिने, अलंकार, मद्य, तंबाखू, सिगारेट, गोड पदार्थ, सुखोपभोगाची सर्व साधने, पडदे, तावदाने, इ शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. 

जन्म लग्न कुंडलीत प्रथम स्थानी शुक्र असता जातक सुंदर, दीर्घायू, मधुर बोलणारा, उत्साही, विद्वान व प्रवासाची आवड असणारा असतो. धन स्थानी शुक्र असता धनवान, रसिक, कवी मनाचा, भाग्यशाली असतो. तृतीय स्थानी शुक्र असता प्रवासाची आवड असते. चतुर्थात शुक्र जातकाला दीर्घायू, भोगी, बलवान, परोपकारी बनवतो. सुंदर गृहाची प्राप्ती होते, उत्तम गृहसौख्य लाभते, वाहन सौख्य लाभते. पंचमस्थ शुक्रामुळे जातक न्यायप्रिय, आस्तिक, सद्गुणी व प्रतिभावंत असतो. उत्तम संतती सुख लाभते. कलेत नैपुण्य येते. षष्ठ स्थानात शुक्र वैवाहिक जीवनात बिघाड निर्माण करतो. जातक मितभाषी असतो. सप्तमात शुक्रामुळे पत्नी सुंदर असते, विवाहपश्चात भाग्योदय होतो, विलासी जीवन जगतो, अष्टमस्थ शुक्र जाताकास रोगी बनवतो. जातक निर्दयी, अहंकारी, तापट, स्त्री लंपट असतो. नवम व दशम स्थानात शुक्र असता जातक सद्गुणी, धार्मिक, दयाळू, तीर्थस्थानी यात्रा करणारा असतो.
लाभस्थानात शुक्र जातकास सर्व प्रकारचे लाभ देतो.  

अनिष्ट अशुभ शुक्र असल्यास खालील उपाय करता येतील.

१) उजव्या हातीच्या अनामिकेत हिरा किंवा झीर्कोन हे रत्न धारण करावे. (तज्ञ ज्योतिषास पत्रिका दाखवून मगच).
२) ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः ह्या मंत्राचा जप रोज १०८ वेळा करावा.
३) श्री सूक्ताचे पाठ करावेत.
४) सफेद वस्तूंचे उदा. तांदूळ, दुध इ दान गरजू व्यक्तीस करावे.


शुभम भवतु 

Wednesday, January 3, 2018

वस्त्रालंकार धारण करण्यास शुभ अशुभ नक्षत्रे




नक्षत्र स्वामी परिणाम
अश्विनी केतूनवे कपडे घेण्याचे वारंवार योग येतात
रोहिणीचंद्रआर्थिक प्राप्ती
पुनर्वसू गुरुकार्यात यश
पुष्यशनीकष्टातून श्रीमंती.
ऊ. फाल्गुनीरवीधन / आरोग्य दायक
हस्तचंद्रप्रयत्नांना यश
चित्रा मंगळशुभ कार्यात वारंवार भाग
स्वातीराहूसुग्रास भोजनाचे योग
विशाखागुरुलोकप्रियता प्राप्ती
अनुराधाशनीसमाजकार्यात यश / नवे मित्र
धनिष्ठा मंगळशेती उत्पन्नात समृद्धी
ऊ.भाद्रपदाशनिसंतती प्राप्ती
रेवतीबुधरत्ने अलंकार व वैभव प्राप्ती
उत्तराषाढा रवीसर्व बाबतीत बरे
भरणीशुक्रकपडे चोरीस जातात
कृत्तिकारवीअग्निभय
मृगमंगळउन्दाराकडून कपड्याची नासाडी
आर्द्राराहूकापड पैसे यांचा तुटवडा
आश्लेषाबुधकपडे नष्ट होतात फाटतात
मघाकेतूसंकटे व धोके
पूर्वा फाल्गुनीशुक्रशासनाचा रोष व त्रास
ज्येष्ठाबुधकपडे हरवतील
मूळकेतूपाण्यापासून धोका
पूर्वाषाढाशुक्रआरोग्य बिघडते
श्रवणचंद्रडोळ्यांचा त्रास
शततारकाराहूविषभय
पूर्वाभाद्रपदागुरुपाण्यापासून त्रास
शुभावार: सोमवार, बुधवार, गुरुवार
शुभ तिथी: १,५,७,९,११,१३

Monday, January 1, 2018

पितृदोष - लक्षणे, परिणाम व उपाय.

पितृदोष.

आपल्या हिंदू धर्मात श्राद्ध हा विधी सांगितला आहे. आपल्या स्वर्गवासी म्हणजे मृत नातेवाईकांचे श्राद्ध केले पाहिजे अशी धर्माज्ञा आहे. काही जण हि बाब टिंगल म्हणून उडवून लावतात. आपल्या पितरांना आणि मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत हविष्य युक्त पिंड प्रदान कर्म करणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये समंत्र पिंडदान आणि सज्जनास भोजन हि मुख्य कर्मे असतात. जे लोक नियमित श्राद्धादी कर्मे करतात, त्यांना पितरांच्या संतुष्टीमुळे आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, संसारसुख, आरोग्य, सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. पितरांच्या तृप्तीमुळे ऐहिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादा शिवाय अध्यात्म प्रगती आणि इष्ट दैवताच्या कृपा प्राप्ती मध्ये हि अडथळे येतात. प्रथम पितरांचा आशीर्वाद नंतर कुलदैवत, कुलस्वामिनी मग इष्ट देवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात ऐहिक व पारलौकिक सुख देण्यास मूळ पितरच कारणीभूत असतात.

श्राद्धाचे एकूण ५ प्रकार आहेत. और्ध्व दैविक, सावन्त्सरिक, एकद्दिष्ट, पार्वण, तीर्थश्राद्ध, नारायण नागबली, व त्रिपिंडी. और्ध्व दैविक हे मृताचे श्राद्ध आहे. व्यक्तीच्या अंत्येष्टी कर्मात ह्याचा समावेश होतो. सावन्त्सरिक हे मृत व्यक्तीच्या मृत तिथीला वर्षातून एकदा करावयाचे कर्म आहे. एकद्दिष्ट हे हि मृत व्यक्तीला उद्देशून केलेलं श्राद्ध कर्म आहे. पार्वण म्हणजेच महालय श्राद्ध यात तिन्ही पिढ्या एकावेळी येतात. हे भाद्रपद कृष्ण पक्षात केले जाते. म्हणजेच पितृ पंधरवड्यात त्या त्या तिथीला किंवा सर्व पितरी अमावास्येला केले जाते. प्रत्येक अमावास्येला हि श्रद्धा करतात त्याला हिरण्य श्राद्ध असे म्हणतात. तीन वर्षे श्रद्धाचा लोप झाला तर त्रिपिंडी श्राद्ध करणे आवश्यक होते. 
शास्त्रोक्त विधीने अंत्येष्टी दशांत क्रिया न होणे. श्राद्धादी कर्माचा लोप होणे, मागील पिढीत कोणी पूर्वज कोणाचा शाप घेऊन मृत्यू पावणे, आकस्मिक, भाजून, खुना मुळे , बुडून, अपघातात मृत्यू पावणे इ कारणांनी पितृदोष निर्माण होतो. अशा मृतात्म्यांना सद्गतीसाठी पितर लोकात जाण्यास गती मिळत नाही. त्यांना चांगली गती मिळावी म्हणूनच त्यांच्या वंशजांनी इहलोकी श्राद्धादी कर्मे करावी असे शास्त्र सांगते. अन्यथा अशा प्रेतात्म्याच्या वंशजास त्यांचा खूप ऊपद्रव सुरु होतो. कृतज्ञतेने आणि श्रद्धेने त्यांच्या वंशजांनी मृत प्रेतात्म्याच्या सद्गतीसाठी प्रयत्न केले म्हणून पितर आनंदाने पितर लोकात जाताना आशीर्वाद देऊन जातात. त्या आशीर्वादाने वंशजांची सर्वार्थाने भरभराट होते हे सत्य आहे.

हल्ली प्रेतांना मंत्रविरहित असा भडाग्नी देण्याची पद्धत पडली आहे. अन्त्येष्टीच्या क्रियेत त्रुटी राहतात. वार्षिक व नैमित्तिक श्राद्धाचा लोप इ मुले ९० टक्के कुटुंब कमी अधिक प्रमाणात पितृ दोषाने पिडीत आहेत. प्रखर पितृ दोषामुळे पुढील अनेक प्रकारचे दु:ख लोकांना भोगावयास लागत आहे. नातेवाइकांशी संबंध अकारण दुरावतात, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला अकारण डोकेदुखी, उदासीनपणा, भयग्रस्तता, ह्रदयात धडधड, रात्री शांत झोप न येणे, झोपेत अचानक दडपून, दचकून जाग येणे, दु:स्वप्न पडणे, मृत व्यक्ती स्वप्नात येऊन जग येणे, असे प्रकार घडतात. संततीचे आरोग्य, शिक्षण, विवाह ह्या बाबतीत अडचणी निर्माण होतात. मुलांची अभ्यासात प्रगती मंदावते. मुले हट्टी असतात. कुसंगती मुळे नुकसान होते. काही कुटुंबात पुत्र संततीच होत नाही. विवाहास विलंब होतो. मंदबुद्धी, अपंग, वेडसर संतती निपजते, मुलींचे कनिष्ट जातीत किंवा अंतर्धर्मिय विवाह होणे, मुली पळून जाणे, मुलीना विलंबाने मासिक पाळी येणे. घरात सारखे क्षुल्लक कारणावरून भांडणे होणे. रोज घरात चीड चीड , कटकट अस्वस्थता, उदासीनता राहणे, उत्पन्नात अकारण घट, धंदा व्यवसायात नुकसान, कर्जबाजारीपण, डॉक्टरला निदान न होणारे आजार, घरात करणी, भानामती, पिशाच्च बाधा संचार याचा त्रास, कशातच बरकत नसणे, पुरवठा कमी पडणे, व्यसनाधीनता, धार्मिक विधी न होणे, घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंगात कनिष्ट देवता, प्रेतात्मा याचा संचार इ पिडा पितृदोष असल्यामुळे  भोगावी लागते.
प्रखर पितृ दोषामुळे अनेक शाप सूचक, दुःस्वप्ने पडतात जसे नदी तलाव विहीर याचे पाणी दिसणे, पाण्यात बुडतोय असे भयग्रस्त अवस्थेत स्वतःला पाहणे, होडीतून कुठेतरी अज्ञात ठिकाणी जातोय असे दिसणे, भांडण दिसणे, कोणाशी तरी भांडतोय असे दिसणे, जेवण बनविणे चालू आहे, स्वतः जेवतोय, खोल दारीतून वर येतोय, नाग दिसणे, नागाला मारणे, रात्री घरात कोणी अदृश्य शक्ती वावरत आहे असे भास होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे असो. 

जन्म लग्न अगर राशी कुंडलीत पंचमात अगर नवमात केतू, अष्टमात अगर व्ययस्थानात गुरु अगर पिडीत रवी चंद्र अथवा कुंडलीत कुठेही राहू पिडीत गुरु किंवा केतू युक्त रवी इत्यादी लक्षणे पितृदोष दर्शवितात. 

पितृदोष निवारणार्थ नारायण नागबली हा काम्य श्राद्ध विद्धि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच करावा.
हा विधी विधी विवाहितांना व अविवाहितांना हि करता येतो.  कुटुंबातील विवाह, मुंज अथवा मृत्यू ह्यानंतर वर्षभर हा विधी करू नये असा शास्त्र संकेत आहे. पण  अयन अथवा संवत्सर बदलल्यावर करता येतो. आई वडील हयात असतानाही हा विधी करती येतो. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्या पर्यंत करता येतो. पौष मास, अधिक मास, क्षय मास गुरु शुक्र अस्त ह्याचा विचार करू नये. रविवार, सोमवार, गुरुवार हे वार, अश्विन, पुष्य, स्वाती, हस्त, श्रवण हि नक्षत्रे उत्तम. आश्लेषा, मृग, आर्द्रा आणि मूळ हि नक्षत्रे सुद्धा चालू शकतात. धनिष्ट पंचक, त्रिपाद नक्षत्रे अशुभ. भद्रा, वैधृती, क्षय व वृद्धी तिथी वर्ज.
हा विधी केल्यानंतर सरळ आपल्या घरी यावे. कुठेही तीर्थक्षेत्री, नातेवाईकाकडे, मित्र मंडळी कडे जाऊ नये. कोणाकडे काहीही खाऊ नये. पितरांच्या सणवारांना दान धर्म व अन्नदान करावे. अगदी २४ तासात मानसिक अवस्थेत शुभ फरक पडतो. ऐहिक अध्यात्मिक जीवनात अडचणींचे निवारण होते. धंद्यात, नोकरीतील अडचणींचे निवारण होते. अडलेली कामे मार्गी लागतात, शत्रू पिडा परिहार होतो, उदार निर्वाहाच्या साधन सुविधेत अनुकुलता येते, घरात बरकत व पुरवठा राहतो. नात्यागोत्याचे संबंध सुधारतात. तापत पण कमी होतो. आंतरजातीय विवाह टळतात . गर्भपाताचे प्रसंग टळतात , मुलांचे आयुष्मान व आरोग्य सुधारते. विवाह अपेक्षेपेक्षाही लवकर व सुस्थळी कमी खर्चात होऊन जातो.  सबब आपली कुंडली तज्ञ ज्योतीर्विदाला दाखवून पितृ दोषाचे निदान करून घ्यावे व आवश्यक ती उपाययोजना लवकरात लवकर करावी.

शुभम भवतु ||
#_पितृदोष ,#_श्राद्ध


#_pitrudosh , #_sharaddha

काही प्रचितीचे ग्रहयोग - भाग १


१) अध्यात्म

जन्म लग्न कुंडलीत अष्टम स्थान गुरु व दशमेशाशी संबंधित असेल तर तर अशी व्यक्ती अध्यामात यशस्वी मार्गदर्शक होते.

व्ययेश आणि पंचमेश युती शुभ संबंधित असलयास व्यक्ती अध्यात्मिक वृत्तीची असते.

गुरु शनी युती ५, ९, १२ व्या स्थानात अध्यात्मिक प्रगतीस पोषक असते.

गुरु राहू , गुरु केतू युती अध्यात्मिक उन्नती च्या दृष्टीने चांगली परंतु संतती सुखाच्या दृष्टीने अनिष्ट. कीर्ती, आर्थिक उन्नती, शास्त्राभ्यास इ साठी चांगली.

नवम स्थानी गुरु - अध्यात्मात प्रगतीकारक.

शुक्र व गुरु ह्यांचा अंशात्मक प्रतियोग - अध्यात्मात प्रगतीकारक

२) शनी - मंगळ युती

शनी मंगळ युती हा एक अशुभ ग्रहयोग होतो. लग्न स्थानात शनी मंगल युती असता जातक अल्पायु असतो. गंभीर आजार होतात. धनस्थानी असता कर्ज राहते. तृतीय स्थानात भावंडांना त्रासदायक. चतुर्थ स्थानात मातृसुखात, गृहसौख्यात व वाहन्सौख्यात न्यूनता असते. पंचमात असता संतती सुखात उणीव राहते. षष्ठ स्थानात शत्रुनाश संभवतो पण स्वतःच्या जीवास धोका असतो. सप्तमात असता वैवाहिक जीवन संघर्षमय असते. पत्नीशी पटत नाही. अष्टमात असता आर्थिक अडचणी आणि संकटे येतात. नवम स्थानात असता भाग्योदयात अडचणी येतात. अपकीर्ती होते. दशम स्थानात शनी मंगल युती असेल तर धंद्यात सतत नुकसान, मानहानी आणि पितृसुखात कमतरता राहते. एकादश स्थानात असता सर्व प्रकारच्या लाभापासून जातक वंचित राहतो. मित्र शत्रू होतात. व्ययस्थानात शनी मंगळ युती दारिद्र्य दर्शवते.

३) नोकरी / निलंबन / धंद्यात नुकसान

अष्टमात दशमेश आणि षष्ठेश युती असेल तर दशमेशाच्या / शश्ठेषाच्या  दशेत नोकरी जाणे, निलंबन, जबर आर्थिक नुकसान, धंद्यात नुकसान इ. घटना घडतात.

चंद्र राहू युती जन्म लग्न कुंडलीत कुठेही असेल तर व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यातून २,४,५,७,८ स्थानी फारच अशुभ असते.

नवमात/ दशमात मिथुनेचा किंवा कन्येचा राहू असेल तर जातक उच्च पदास पोहोचतो.

४) आर्थिक घोटाळे 

धन स्थानी धनेश व अष्टमेश युती असेल तर सर्व प्रकारचे आर्थिक घोटाळे होतात.

५) कष्टमय जीवन

तृतीय स्थानात ( पराक्रमात ) शनी असेल तर, खूप प्रयत्नानंतर यश मिळते.

६) कीर्ती / प्रसिद्धी 

नवमातील चंद्र गुरु माणसाची कीर्ती मरणानंतरही मागे ठेवतो. 

७) आर्थिक प्रगती

लाभ स्थानाचा स्वामी धन स्थानी धनेशाच्या युतीत असल्यास खूप आर्थिक प्रगती होते.

शनी मंगळ युती लग्नाच्या किंवा रवीच्या व्ययात असता कर्जबाजारी राहावे लागते.

चंद्र गुरु युती जीवनभर अआर्थिक सुस्थिती ठेवते.

८) राजकारण 

रवी भाग्येशाबरोबर केंद्र स्थानी अथवा कोण स्थानी शुभ ग्रह दृष्टीत अथवा शुभ राशीत असेल तर अशी व्यक्ती राजकारणात यशस्वी होते.

शुक्र रवीच्या पुढे शुभ स्तिथीत असेल तर राजकीय अधिकार लाभतो.

९) श्रीमंती / आर्थिक परिस्थिती 

व्ययेश व्ययात अष्टमेश वा शाश्ठेषा सह शुभादृष्ट असेल तर अशी व्यक्ती वाहनसुख, ऐषारामी, भरभराटीचे जीवन जगते.

धनाधिपती शुभ ग्रह असून अष्टमात असेल तर पैशाची कमतरता पडत नाही.

मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक लग्नाला चंद्र मंगळ युती हा लक्ष्मी योग आहे.

तृतीय आणि दासःम स्थानी मंगळ असेल तर जातक केव्हाही उपाशी राहणार नाही. काही न काही करून पैसा मिळवतोच.

शनी हर्शल धनात  - जबरदस्त आर्थिक फटका.

शनी मंगळ धनात - दारिद्र्य योग.

चंद्र केंद्रात शुभ स्थितीत असता आर्थिक स्थिती चांगली राहते.

धनेश व्ययेश परिवर्तन योग - धन नाश होतो.

१०) पितृसुख

जन्म कुंडलीत कुठल्याही स्थानात रवी - शनी युती असल्यास पितृसुखात कमतरता असते. कष्टमय जीवन असते.

शनी नवमात असता पितृसुख कमी असते.

११) संतती सौख्य / पिडा / निपुत्रिक योग

पुरुषांचे कुंडलीत गुरु हर्शल अंशात्मक युती असता संतती पासून दुख होते. स्त्रियांचे कुंडलीत निपुत्रिक योग होतो.

पंचमात व भाग्यात शनी, मंगल, रवी, हर्शल, नेपच्यून नसतील व त्यांच्या राशी व दृष्टी हि नसतील तर उत्तम संती सुख लाभतेच.

गुरु राहू , गुरु केतू युती अग्नी राशीत अथवा अशुभ राशीत असता वंध्या योग होतो.

स्त्रियांच्या कुंडलीत वक्री गुरु वंध्या योग दर्शवतो.

अध्यात्मिक योग, अधिकार योग व संकात्कारक असते.

बुध शनी युती संतती सुखाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरते.

वक्री गुरु कन्या संतती देतो. पुत्र संतती बाबत चिंता निर्माण करतो.

पाप ग्रहाच्या कार्तरीतील गुरु संतती चिंता निर्माण करतो.

गुरु पंचमात असून त्याच्या पंचमात पाप ग्रह असल्यास संतती होण्याची शक्यता खूप कमी असते.

गुरूच्या पंचमात शनी असल्यास अल्प संतती अथवा संततीत बरेच अंतर असते.

शनी रवी अष्टमात असणारी स्त्री वंध्या असण्याची शक्यता असते.

शनी मंगळ  नवमात किंवा दशमात असणारी स्त्री वंध्या असण्याची शक्यता असते.

शनी पंचाम्स्थानी असता संतती सुख मिळत नाही.

शनी मकर व शुक्र तुला रहित असेल तर संतती प्रतीबंधक योग होतो.

१२) वैवाहिक सौख्य / समस्या

रवी - शनी अशुभ योग असल्यास सर्वच बाबतीत अपयश येते. विवाहास विलंब होतो. पती - पत्नी विजोड म्हणजे व्यक्तिमत्व आणि स्वभावाने भिन्न असतात. पतीस आर्थिक उन्नतीस अडथळे येऊन शारीरिक त्रास होतो.

रवी हर्शल अश्भ योग संसारी जीवनात संकटे आणतो.

चंद्राच्या सप्तमात हर्शल असता वैवाहिक जोडीदार अत्यंत लहरी व विक्षिप्त असतो.

स्त्री जातकाच्या कुंडलीत रवी - चंद्र शुभ योग असल्यास अत्यंत सु स्वभावी पती असतो. पुरुष जातकाच्या कुंडलीत अशा बाबतीत दैवाची साथ लाभते.

स्त्री जातकाच्या कुंडलीत सप्तमात स्त्री राशीचा गुरु असेल तर पती प्रेमळ व सन्मानाने वागवणारा असतो.

पुरुषाचे कुंडलीत कन्या, वृश्चिक आणि मकर राशीचा गुरु विधुर योग दर्शवतो.

अष्टमस्त गुरु श्रीमंत मुलीशी विवाह घडवतो.

स्त्रियांच्या कुंडलीत दशमात असलेला गुरु विवाहोत्तर पतीस उन्नती कारक असतो.

गुरु शुक्र अंशात्मक अशुभयोग असल्यास जोडीदाराची निवड चुकते.

सप्तमात शनी राहू , शनी केतू, शनी बुध, - विवाहाची शक्यता नसते.

सप्तमात शनी नेपच्यून युती - काम सुखात न्यूनता.

शुक्र राहू युती  - आंतरजातीय / अंतर धर्मीय विवाह. अनारोग्य, संसारिक अशांतता. विवाह बाह्य संबंध.

चंद्र शुक्र युती क्रूर नक्षत्रात असल्यास वैवाहिक सुख लाभत नाही.

रवी मंगळ युती वैवाहिक सुखात कमतरता आणतात.

चंद्र शनी युती - स्त्री जातीपासून सुख कमी मिळते.

सप्तमेश लाभेश शुभ संबंध - पत्नी मिळवती असते. पत्नीकडून आर्थिक लाभ होतो.

सप्तमेश लग्नात, धनात अथवा नवमात असता विवाहानंतर भाग्योदय होतो.

सप्तमात शुक्र , चंद्र अथवा दोन्ही ग्रह असता विवाह लवकर होतो.

चंद्र व शुक्र दोन्ही जलराशीत असतील तर विवाह लवकर होतो.

स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळाच्या व्ययात शनी, पतीसुखाची हानी करतो.

मुलीच्या पत्रिकेत पंचमातील मंगळ विवाहास उशीर करतो.

वृषभ लग्नास सप्तमात धनु राशीचा गुरु वैवाहिक जीवनात तीव्र असमाधान निर्माण करतो.

शुक्र व गुरु ह्यांचा अंशात्मक प्रतियोग असल्यास विवाह लवकर जमतो.

कृत्तिका नक्षत्रातील शुक्र घटस्फोट, विवाहपूर्व मातृत्व, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक असमाधान दर्शवतो.

शनी अष्टमात असलेल्या व्यक्तीचा साथीदार नेहमी रोगग्रस्त राहतो.

मिथुनेतील शुक्रामुळे पुरुष स्त्रीच्या अधीन राहतो.

मुलीच्या पत्रिकेत शुक्र मंगळ १,२,४,७,१० असेल तर स्थळ चांगले विनाकष्ट मिळते.

लग्नाच्या सप्तमात पापग्रह, शुक्राच्या सप्तमात पापग्रह किंवा शुक्र पापग्रह युक्त, दृष्ट असल्यास जातकस पत्नीकडून कामसुख मिळत नाही.

शुक्राच्या प्रतियोगात शनी वक्री - स्त्री सुख लाभत नाही

शुक्र कन्या राशीत असता विवाहास विलंब होतो.

अष्टमात राहू / हर्शल असता अनेकवेळा लग्न मोडते.

मुलीच्या पत्रिकेत अष्टमात चंद्र, गुरु, शुक्र असता पती श्रीमंत मिळतो.

भाग्येश सप्तमात असेल तर गरीबाघरच्या मुलीलाही भाग्यवान पती मिळतो.

सप्तमेश लग्नी असता स्त्रिया पतीच्या लाडक्या असतात.


१३) आकस्मिक अशुभ घटना

शनी हर्शल युती ज्या भावात असेल त्यासंबंधी फलात आकस्मिक अशुभ घटना घडवते.

१४) पितृदोष

चंद्राच्या चतुर्थातील नेपच्यून वास्तू दोष व घराण्यातील परंपरागत पितृदोष दर्शवतो.

१५) स्वभाव

मंगल कन्या अथवा मिथुन राशीत असता अहंकारी स्वभाव असतो.

कर्क, वृश्चिक आणि मीन राशीतील मंगळ पंचमात असेल तर बेजबाबदार, आळशी, व्यसनी वृत्ती राहते. जातक मनाने चंचल असतो.

अष्टमातील शनी आयुष्यवर्धक असला तरी जातकाला धनलोभी बनवतो.

लाग्नाधीपती सहाव्या व आठव्या स्थानी असता व्यक्ती तापट स्वभावाची असते.

चतुर्थातील चंद्र असता जातक दयाळू असतो.

शनी चंद्र युती धनात - कठोर भाषा व अप्रमानिकपणा.

तृतीयात केतू : कलहप्रिय.

१६) मंगळ - राहू युती

४,५,७,१२ स्थानात - खूप अशुभ. १,३,६,१० स्थानात - साधारण अशुभ. बाकी स्थानात मिश्र फळे मिळतात.

तृतीय स्थान - बंधू भगिनींना घातक
चतुर्थ स्थान - गृह सौख्याचा नाश.
पंचम स्थान - संततीत वैगुण्य / अपंगत्व
षष्ठ स्थान - तीव्र स्वरूपाचा आजार.
सप्तम स्थान - बहु भार्या योग, विवाह पूर्व प्रेम संबंध.
अष्टम स्थान - अल्पायु, सतत आजारपण.
नवम स्थान - प्रत्येक कार्यात अपयश.
दशम स्थान - नोकरी व्यवसायात सतत संकटे.
व्ययस्थान - आर्थिक संकटे.

१७) रत्न शास्त्र

राहू, केतू व शनीची रत्ने तज्ञ ज्योतीर्विदाच्या सल्ल्याशिवाय वापरणे धोक्याचे असते. विशेषत: स्त्रियांनी काळजी घ्यावी.

१८) शत्रू पिडा / शत्रू नाश

षष्ठ स्थानी पाप ग्रह जसे केतू , राहू, शनी असल्यास शत्रू वर विजय मिळवतो परंतु दीर्घ आजारही होतात. कर्ज मुक्तीस सहाय्यक ग्रहमान राहते.

षष्ठ स्थानाचा अधिपती लग्नात असल्यास शत्रू नाश संभवतो.

१९) शिक्षण

षष्ठेश - लग्नेश परिवर्तन योग वैद्यकीय शिक्षणात प्रगतीकारक होतो.

२०) शुक्र - मंगल युती

शुक्र मंगळ युती १,५,६,७,१२ स्थानी असल्यास नैतिक अध:पतन होते.

२१) गुरु ग्रह

गुरु कन्या राशीत कुंडलीत कुठेही असो, त्या स्थानाच्या कारक फळात हानी करतो. अशावेळी गुरुचे रत्न वापरू नये.

गुरु सर्वात जास्ती मंगळाने बिघडतो.

अष्टमात गुरु अथवा शनी दीर्घायुष्य दर्शवतात. जाताकास शांत व सजग मरण येते.


२२) गुरु शनी युती

गुरु शनी युती मिथुन, सिंह, कन्या ह्या राशीत असता वंश नाश योग होतो.

स्त्री जातकाच्या पत्रिकेत ५,७,८ स्थानातील गुरु शनी युती अशुभ असते.

२३) रवी ग्रह 

रवी सर्वात जास्त केतूने बिघडतो.

24)   आरोग्य / आजार 

कर्क राशीत मंगळ / शनी - दमा व छातीचे विकार.

२५) शनी मंगळ यांचे असण्शात्मक प्रतियोग असल्यास जीवावरचे प्रसंग येतात.

२६) शुक्र व चंद्र एकमेकांच्या लाभ योगात असतील तर वाहन सुख लाभाते, अथवा एकमेकांच्या दृष्टीत असावेत.

२७) चतुर्थात केतू - वास्तुदोष.

२८) हर्शल / नेपच्यून ३,९,१२ स्थानी असता दूरचे प्रवास घडतात.

२९) राहू १,६,७,१२ स्थानी हानिकारक असतो.

३०) दशमात मिथुनेचा केतू अति नाशकारक होतो.