साडेसाती असताना शनीचे जंतर यंत्र वापरावे. कुंडलीत मंगळ नीच राशीत असेल किंवा ८ व १२ स्थानी असेल तर मंगळाचे जंतर यंत्र वापरावे. ज्यावेळी एखादा ग्रह नीच राशीतअसेल निर्बली असेल किंवा कुंडलीत अशुभ स्थानात पडला असेल, अशुभ स्थानाचा स्वामी असेल अशावेळी त्या ग्रहाचे जंतर यंत्र वापरावे.
ज्या ग्रहाचे जंतर यंत्र वापरायचे त्या ग्रहाचे वारी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन त्या ग्रहाचे जंतर यंत्र भोजपत्रावर अष्ट गंधाने लिहून ते उजव्या हातात दिलेल्या संख्ये इतका त्याच दिवशी जप करावा. नंतर ते यंत्र धूप दाखवून ताईतात घालून पाकिटात ठेवावे.
रवी यंत्र : - रवी ग्रहाचे अशुभ फळात घट होऊन शुभ फळात वृद्धी होण्यासाठी रविचे यंत्र वापरता येते, कुंडलीत रवी ग्रह बिघडला असता अनेक अशुभ फळे प्राप्त होतात जसे, पितृसुखात कमतरता, सतत अपमान आणि उपेक्षा वाट्याला येणे, सर्व साधारण अनारोग्य राहणे, आपल्या शब्दाला किंमत नसणे, करिअर मध्ये अडचणी, रवी ग्रह बिघडला असता कुंडलीतील इतर ग्रहांची अवस्था कितीही चांगली असली तरी एकंदर उर्जितावस्था येण्यास उशीर होतो. सतत चिंता ग्रस्त राहणे, शत्रू पिडा, नीटनेटकेपणाचा अभाव, सौंदर्य दृष्टी, तारतम्य, जबाबदारीची जाणीव इ गोष्टी अभावानेच आढळतात.. हाती घेतलेल्या कामात अपयश, विलंब, वरिष्ठांशी न पटणे, हृदयविकार, पाठीचे मणक्याचे आजार, रक्त विकार, हाडांची दुखणी इ आजार डोकं वर काढतात. अशा परिस्थितीत रवीचे यंत्र खूप निर्धोक आणि फायदेशीर ठरते. रवीच्या शुभ परिणामात वाढ होते जसे प्रतिकार शक्ती, कीर्ती, आरोग्य, ईश्वरभक्ती, सद्गुण, भरभराट, यश, प्रगती, प्रवास, भाग्य, पितृसुख इ.सदर यंत्र हे सोने, चांदी किंवा तांबे यापैकी धातूमध्ये बनवून घ्यावे आणि ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः ह्या मंत्राने अभिमंत्रित करावे. जप संख्या ७० माळा.
चंद्र यंत्र :कुंडलीमध्ये चंद्र बिघडला असेल आणि चंद्राचे रत्न मोती वापरता येत नसेल अशावेळी खात्रीचा उपाय म्हणून चंद्राचे यंत्र वापरता येते. जसे कर्क लग्नास लग्नेश चंद्र अष्टमात, षष्ठात किंवा व्याव्यात असेल तर मोती वापरता येत नाही. त्यामुळे चंद्राच्या अशुभ परिणामात वाढच होईल म्हणून त्याला पर्याय म्हणजे चंद्र यंत्र. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे. तो मातेचा कारक आहे. कुंडलीतील अशुभ स्थितीतील चंद्र मानसिक विकार निर्माण करतो. कितीही लौकिक सुख असले तरी काहीतरी न्यून राहतेच. मानसिक असमाधान राहते. सर्दी, पडसे, कफ, गळा व छातीचे विकार, दृष्टीदोष इ आजार होऊ शकतात. चंद्र राहू युती, चंद्र केतू ग्रहण योग, वृश्चिकेचा चंद्र, चंद्राचा पाप कर्तरी योग, अशुभ ग्रहाच्या दृष्टीत, अशुभ ग्रहाच्या प्रतियोगात चंद्राचे अशुभ फालत वाढ होते. ह्या व्यतिरिक्त चंद्राच्या शुभ फळात वाढ होण्यासाठी चंद्र यंत्र उपयुक्त ठरते. चंद्र यंत्र सिद्ध करण्याकरिता एखाद्या शुभ सोमवारी ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः ह्या मंत्राचा ११० माळा जप करत जलाभिषेक करावा.
मंगळ यंत्र : मंगळ दोष परीहारासाठी मंगळाचे यंत्र वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते. मंगळाच्या शुभ फळात वृद्धी होण्यासाठी मंगल यंत्राचा उपयोग होतो. कुंडलीत अशुभ मंगळ असल्यास मंगळाचे रत्न पोवळे वापरता येत नाही अशावेळी मंगल यंत्र वापरणे तितकेच प्रभावी ठरते. कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि व्यय स्थानात मंगळ असल्यास अशुभ होतो. मंगळ हा कर्क राशीत नीचेचा होतो. तोही अशुभच. शुभ स्थितीतील मंगळामुळे जातकाला त्याच्या भावंडा पासून लाभ होतो. मित्रांशी चांगले संबंध राहतात. शतृपिडा असल्यास निवारण होते. मानसन्मान, प्रतिष्ठा ह्यात वृद्धी होते. मंगळ यंत्र सिद्ध करण्याकरिता शुभ मंगळवारी ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः या मंत्राचा १०० माळा जप करत जलाभिषेक करावा.
इतर नव ग्रहांविषयी यंत्रांची सविस्तर माहिती पुढच्या भागात. तूर्तास शुभम भवतु.....
No comments:
Post a Comment