नमस्कार माउलींनो,
घर घर कि महाभारत आपण ज्याला म्हणतो, सासू सून संबंध हे बऱ्याच कुटुंबात बिघडलेले असतात. नव विवाहित सून, तिशी - चाळीशीतल्या महिला किंवा वृद्ध सासू तसेच पुरुष मंडळी यात विनाकारण भरडले जातात. घरातलं कौटुंबिक वातावरण बिघडते. बऱ्याचदा सासूला किंवा सुनेला मनापासून वाटत आपले आपल्या सुनेशी किंवा सासूशी संबंध चांगले राहावेत, घरात शांतता सुख आणि समृद्धी नांदावी पण कुणाच्यातरी स्वभावामुळे, सवयीमुळे किंवा जीवनशैलीमुळे दोन व्यक्तीमध्ये सुसंवाद राहत नाही. कालांतराने दुरावा निर्माण होतो. हे सर्व आपण नक्कीच टाळू शकतो. कुटुंबात शांती नांदावी. परस्परात मेळ राहावा म्हणून सासू व सून दोघीही किंवा कुणीतरी एक खालील मंत्र उपासना करू शकते. मंत्र उपासनेमुळे नक्कीच फरक पडतो. अगदी स्वतः उपासना करून रोकडा प्रचीती घ्यावी.
सोप आहे, दिवसभरातली ठराविक वेळ निवडा. घरातील शांत जागा निवडा. एखादे आसन अंथरा. छानसा धूप लावा. तुपाचा दिवा लावा आणि खालील मंत्र ३१ वेळा स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणा. असे सलग ४३ दिवस करा. ८-१५ दिवसात कौटुंबिक वातावरणात फरक वाटायला सुरुवात होईल हे नक्की. एकदा वेळ आणि जागा निवडली कि त्यात बदल करू नका.
मंत्र :
==========================================
|| श्री राम ||
धर्म की माता बनकर कैकयी ने वरदान लिया |
श्री राम को वनवा हुआ |
श्री दशरथ को दुख साथ हुआ |
सीता जी भी चली वनमे |
सास ससुर को पछताताप हुआ |
सास ससुर करे प्यार बहुसे भाव अपार हुआ |
बहु चली वनमे सास ससुर विभाव दर्द हुआ |
सास ससुर जगमे बहुसे प्यार करे |
यह धर्म पुण्य का सार हुआ |
जो माने शक्ती राम की पुण्य स्वीकार हुआ |
|| जय श्री राम ||
=========================================
शुभम भवतु ||
टीप : आपणास लाभ झाल्यास अनुभव नक्की कळवायला विसरू नका.
No comments:
Post a Comment