Wednesday, October 7, 2020

ज्योतिष लेख : न जुळलेल्या मनांच्या तारा.

 

बस आता घाटातून चालली होती. वातावरणात गारवा जाणवायला लागला होता. दूर पूर्वेला सूर्य उगवत होता. पक्ष्यांचे कुंजन, चोहीकडे उंच हिरवे डोंगर कडे. दाट झाडी आणि धुकं. बस महाबळेश्वर मध्ये प्रवेश करत होती. उल्हसित मनात हनीमूनच्या एकेक विचारांनी अमोलच्या मनात गुदगुल्या होत होत्या. बाहेर अजून थोडा अंधार होता. बस मध्येही सर्व अद्याप झोपेत होते. शेजारीच बसलेल्या मीनलच्या कानाच्या पाळीचा हलका चावा घेत अमोलने तिला जागं करण्याचा प्रयत्न केला. "मिनू, उठ." "महाबळेश्वर आलं". "बाहेर बघ, काय मस्त वातावरण आहे." त्याला वाटलं, मीनल त्याच्या अजून कुशीत शिरण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या गालावर आपला गाल हळुवारपणे घासत लाडात येत म्हणेल, "म्म्म झोपूदे ना अमु! " मग तो हि तिला अजून घट्ट जवळ ओढून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत म्हणेल, "मिनू... ..... , चल आता लवकरच हॉटेलही येईल." ....................... अमोलने मिनलच्या कानाच्या पाळीचा हळुवार चावा घेण्याचा प्रयत्न करताच क्षणी मीनल उसळली. "आई ग .... के... ...... काय धसमुसळ्या आहेस रे तू." काय नुसता बघ्घाव तेव्हा अंगचटीला येत असतोस. येणारच आहे ना ते तुझं महाबळेश्वर, थंडी काय कधी अनुभवली नाहीस काय? शी बाबा, जरा कुठे आरामात झोपावं तर तुझी भुणभुण सुरु, उठ उठ .. उठ उठ... अमोल काहीच बोलला नाही. रस्त्यावर काही अंतर बरेच खड्डे होते. त्या खड्ड्यांतून जाताना बसलेले हादरे अमोलला जसे जाणवलंच नाही. त्याच्या मनाला बसलेले हादरे पुरेसे होते. मीनल त्याच्यापासून अजूनच दूर सरकून बसली होती. खिडकीवर डोकं टेकत डोळे बंद करून तिला आणखी काही वेळ झोपायचं होत. बाहेरच्या वातावरणाशी तिला काही घेणं देणं नव्हतं. तिच्यासाठी तो नेहमीचाच दिवस होता. बाहेर दिवस उगवत होता आणि अमोलच्या मनात रात्र अजून गडद होत होती...........

बऱ्याच कपल्स मध्ये हे असे किंवा अशासारखे प्रसंग घडत असतात. आणि अशा प्रसंगांची मालिका सुरु झाली कि नातं कधी तुटण्याच्या मार्गावर येत ते कळत नाही. वैवाहिक सुखाचा कारक शुक्र जर कुंडलीत बिघडला असेल, कुंडलीतले सप्तम स्थान किंवा सप्तमेश बिघडला असेल तर असं होतं. म्हणून कुंडली जुळवताना फक्त गुण नाहीत ग्रह मैत्री, नक्षत्र मैत्री, स्वभाव थोडक्यात एकमेकांची कॉम्पॅटिबिलिटी मेन म्हणजे कुंडलीतील शुक्र, गुरु, मंगळ हे ग्रह अभ्यासणे महत्वाचे ठरते. त्यातूनही असे अनुभव येत असतील तर ज्योतिष शास्त्रीय उपायांची कास धरणे अगत्याचे, उदा. रत्न, रुद्राक्ष, ग्रह शांती आणि महत्वाचं म्हणजे मंत्रोपासना. एखादा तंतू वाद्य परफॉर्म करणारा वादक जसा आपल्या वाद्याच्या तारा खेचून ताणून व्यवस्थित ठेवतो तसाच कुंडलीतील बिघडलेले ग्रह ज्योतिष उपाय व उपासनेमुळे 'ठीक' करता येतात.


ज्योतिषी आमोद विष्णू ननावरे (७७०९५९४९०२)

No comments:

Post a Comment