आज वीक ऑफ होता. छान सलमान आणि गोविंदाचा पार्टनर एन्जोय करीत होतो टीवीवर. मस्त पावसाळी दिवस. रिप रिप पाउस पडतोय. निवांत घरी टीव्हीवर आवडता सिनेमा पाहावा. घोटभर गरम गरम वेज सुप घ्यावे माज्जानी लाईफ. पण कसले काय, आपल्या वीज मंडळाचा कारभार म्हणा कि गेल्या जन्मी मी केलेली पापकर्म - लाईट गेली. जळले मेले लक्षण ह्यांचे,आग लागली ह्यांच्या मढ्याला.... सौ. नि आपल्या सात्विक संतापला वाट करून दिली. मी आपला जवळच पडलेला पेपर उचलला आणि उगाचच शिळ्या बातम्या वाचत बसलो, तेवढ्यात कन्यारत्न वैतागत माझ्याजवळ आले. "पप्पा लाईट कधी येणार?सांगाना!" मी म्हणालो, "येतील ग." "काय एवढ त्यात." पण तिचा आग्रहच... मग म्हटले चला बघुयाच. पंचांग पाहिले आणि म्हणालो ५-६ मिनिटात येतील लाईट. काय बात है| संध्याकाळी ७:४९ ला गेलेली लाईट ७:५४ ला आली. पण लिंक तुटल्या मुळे सिनेमा पहावासा वाटलाच नाही.
सौ. नि आणि कन्यारत्नाने तिचा आवडता सिनेमा एंजॉय केला. कारण काय विचारता! सिनेमा सलमानचा म्हटल्यावर प्रश्न नाही विचारायचे राव, निमूट रिमोट सौं. च्या ताब्यात द्यायचा.
तर ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी रुलिंग प्लॅनेटचा वापर करायचा ठरवले.
तारीख : ०९ / ०७ / २०१६. ठिकाण : वसई.
रुलिंग प्लॅनेट खालील प्रमाणे
लग्न : मकर स्वामी शनी - सुरु - १९:४२
नक्षत्र : पु. फाल्गुनी - स्वामी रवी
चंद्र राशी : सिंह - स्वामी रवी
वार : शनिवार - स्वामी शनी.
एखादी घटना काही मिनिटात किंवा तासात घडणे अपेक्षित असल्यास लग्न विचारात घावे म्हणून मी पाहिले मकर राशीत उत्तराषाढा (रवी) श्रवण (चंद्र) आणि धनिष्ठा (मंगळ) हि नक्षत्र आहेत.
वरीलपैकी चंद्र आणि मंगळ रुलिंग मध्ये नाहीत, रवी आहे ,म्हणून मी असा निष्कर्ष काढला कि रवीच्या नक्षत्रात आणि शनीच्या सब मध्ये लाईट येतील.
केपी क्र. १९१ : रवीच्या नक्षत्रात शनीच्या सबची व्याप्ती आहे ३:२०:३ सोयीसाठी मी ३ अंश घेतले.
लग्न एक अंश पुढे जाण्यास साधारण ४ मिनिटे लागतात. म्हणजे ३*४ = १२ मिनिटे. मकर लग्न १९:४२ ला सुरु झाले होते म्हणून ४२ + १२ = ५४ - १९:४९ ला गेलेली लाईट १९:५४ ला आली. म्हणजे ५ मिनिटात !!!
कन्यारत्न अवाक! मी उगीचच माझी नसलेली कॉलर टाईट केली.
प्रिय वाचकांनो!
तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची उत्तरे ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून हवी असल्यास भेटीसाठी किंवा On line मार्गदर्शनासाठी कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधा. - (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 ह्या वेळेत )- 9890787502.
धन्यवाद ..
आपला,
आमोद ननावरे.
#Short_story, #marathi_katha, #katha, #story, #from_amod, #amod, #nanavare, #amodnanavare, #marathi-katha, #marathi, #Maay-marathi, #Maaymarthi, #mangya, #breakup, #love, #mangyache_break_up, #short_stories, #marathi, #short_Stories,#Dustbin, #Kachara_Kundi, #India, #Short_Story_Dustbin, #KP_Astrology, Krishnamurthi_Paddhati, #KP, #Home, #Property, #Bhavishya, #Astro_Amod_Nanavare, #Desired_Property, ##My_Home, #Indian_Astrlogy, #Indian_Astro, #Astroloty_India, #Will_get_that_property?, #When_will_the_Light_resume, #Electricity, #lait_kadhi_yeil?,
No comments:
Post a Comment