Friday, July 22, 2016

KP Astrology: अपेक्षित घर मिळेल का? (Will I be able to purchase the desired home?)

                                                                      ||श्री स्वामी समर्थ ||

दिनांक - २२ / ०७ / २०१६. वेळ दुपारची. पावसाची संतत धार. कुंद वातावरण. बर्यापैकी अंधारून आलेला आसमंत. नुकतेच जेवण झाले होते, उगीचच लेकीच्या अभ्यासात डोकाऊन पाहिले, गणिताचा अभ्यास चालू होता बाईसाहेबांचा, म्हटले हा आपला प्रांत नव्हे. उगीचच वाट चुकल्यासारखे झाले. गणिताचा आणि आपला ३६ चा आकडा. आकडे पाहिले कि आपल्याला आकडी येते. आळसात पडून राहिलो नुसताच. तसा फेसबुक आणि whats up वगैरे असतातच रोज time pass साठी, पण आज त्यांचाही कंटाळा आला होता. अचानक अगदी अचानक दाराची बेल वाजली. पाहतो तर काय भर पावसात अर्धा अधिक भिजलेला माझा परम मित्र काशिनाथ माने एका हाताने छत्री सावरत आणि दुसऱ्या हाताने आपला अर्धा अधिक भिजलेला शर्ट झटकत दारात उभा. थोडा त्रासलेल्या स्वरातच त्याने विचारले "येऊ का?" मी म्हणालो, "आता हे काय विचारणे झाले का?" असे म्हणता मी दरवाजा थोडा आणखी उघडला, काशिनाथाचे थोडेसे स्थूल ध्यान अक्षरशः घरात घुसले! वय चाळीशीला आलेले. डोक्यावरचे छप्पर सुद्धा अर्धे अधिक गायब. सौनि  त्याला पाहताच चहाचे भांडे चुलीवर ठेवले (अहो चूल म्हणजे आपला gas) "काश्या, अरे आज कसे काय आठवण काढलीस? " तसा काश्या सुटला. बायकोने दिलेला पाण्याचा ग्लास, खाली ठेवत तोंड पुसत तो म्हणाला, "अबे काय सांगू तुला नान्या (अस्मादिक मित्र मंडळीत "नाना" ह्या नावाने संबोधिले जातात.) एक फाकडू साईट पहिली यार, तुझ्या त्या पेट्रोल पंपाच्या मागे." "मस्त ८६० चा एरिया. ६ व मजला. आवारात १२ माही विहीर.""हॉल मधून काय वीव्ह दिसतो यार. हिरवे गार" भरपूर प्रकाश. भरपूर हवा. लिफ्ट. ५५००/- चा रेट.""साला बिल्डर आपल्या सासर्याचा चड्डी आहे (मध्येच त्याने जीभ चावल्याचे मी पाहिले. बायकोचे पण लक्ष नव्हते म्हणा. ती आत किचन मध्ये आलं ठेचत होती.) सगळ मिळून ४९ -५० पर्यंत जाईल." "पण एक झोल आहे नान्या, सेकण्ड सेल आहे. आता मी घेणार म्हणजे माझा आत्ताचा विकला गेला पाहिजे, समोरची पार्टी थांबली पाहिजे यार". "तू तुझे ते पंचांग बघून बोल ना, काम होईल का?" एका दमात काशिनाथ उर्फ काश्याने त्याच्या येण्याचे प्रयोजन माझ्यासमोर कथन केले. काही महिन्यापासून आमचा हा गडी नवीन घराच्या शोधात होताच, पण एकूण त्याच्या ह्या गोष्टीवरून तरी त्याला हि साईट खूप आवडल्याचे समजले. तेवढ्यात मंडळींनी आम्हा दोघांसाठी गरम गरम आल्याचा चहा आणून दिला. अहाहा अशा अवचित पावसाळी दुपारी वाफाळलेला चहा समोर आला कि तबियत एकदम खुश होणार नाही कि काय! मी म्हणालो काश्याला, ठीक आहे बघूया. तू चहा घे आधी. मस्त पैकी भुरके मारत आमचे चहापान चालू झाले. चहा घेता घेता जवळच्या पिशवीतून डेरीमिल्क काढत त्याने माझ्या लेकीसमोर धरले. बाईंची कळी एकदम खुलली. तिने काशिनाथ काकाचे आभार मानत ते डेरीमिल्क स्वीकारले. दुसरीकडे मी माझा संगणक सुरु केला. पंचांग काढले आणि मनात नियमांची जुळवा जुळव करू लागलो. 
संपलेल्या चहाचा कप खाली ठेवत काश्या म्हणाला "बोला ज्योतिषी बुवा काय करायचे?" मी त्याला लगेच दाबले, खोट्या रागात त्याला म्हणालो, " काश्या, गधड्या, मी काही ज्योतिषी बुवा बिवा नाहीये काय! उगाच नसती विशेषण लाऊ नकोस." "Its my hobby man! " तसा तो वरमला. "नान्या बघ यार कुछ हो पायेगा क्या?" 
मी त्याला म्हणालो, "मला अपेक्षित घर मिळेल काय?" असा मनात प्रश्न धर आणि एक random नंबर दे.
त्याने दिलेला नंबर आणि प्रश्न कुंडली ह्यावरून मी त्याला सांगितले, " माफ कर मित्रा, ह्या भानगडीत तू न पडलेलं बर, "Look for another site, This seems not your cup of tea" माहित नाही पण त्याला जणूकाही हेच उत्तर अपेक्षित होत. "म्हsss No problem Nanya, better I'll look for another site." तो विषय तिथेच संपला... जुन्या मित्राच्या सहवासात, ती दुपार छान गेली. शाळा कॉलेजच्या त्या रम्य आठवणी, आणि आता चाळीशी पर्यंत आलेली आपली गाडी.. अभी तो बहुत और आगे जाना है | मी त्याला ह्या सौद्या पासून दूर राहायला का सांगितलं? चला पाहूया. 

मला अपेक्षित घर मिळेल का? 
दिनांक : २२/०७/२०१६ 
वेळ : १५:४८
के पी # ८२
स्थळ : वसई 

१) वास्तू संबंधी प्रश्न पाहताना चतुर्थाच्या उपनक्षत्र स्वामी व तो ज्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे तो ग्रह विचारात घ्यावा.
२) प्रश्न जर ठराविक वास्तू संबंधी असेल तर चातुर्थाचा उपनक्षत्र स्वामी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून त्याचा नक्षत्र स्वामी व तो यापैकी काही एक स्थिर राशीत असावा तसेच चतुर्थ स्थान किंवा लाभ स्थानाचा कार्येश असावा. सदर प्रश्न कुंडलीत चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध असून कर्क ह्या चर राशीत आहे. तसेच तो तृतीय आणि व्यय स्थानाचा कार्येश होत होता. तृतीय म्हणजे चतुर्थाचे व्यय स्थान that means  तोटा. त्याचा नक्षत्र स्वामी रवी देखील कर्क राशीत म्हणजे विषयच संपला. So, it shows that the luck is not in favor.  उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? ४० - ५० लाखाची investment  करायची म्हणजे, ज्योतिषाचा सल्ला घ्यावा ह्या मताचा मी आहे. माझा व्यक्तिगत अनुभव अत्यंत तापदायक होता,जेव्हा मी घर खरेदी केले होते. साधारण २ वर्षापूर्वी. तेव्हा मी ज्योतिष शास्त्राचा उपयोग नव्हता केला. Had I known that these things are destined to happen, I would not have taken that much tension. I will share that story with you soon. Its interesting and worth knowing. 

तूर्तास तुमची रजा घेतो.. ... मार्गदर्शना साठी ९८९०७८७५०२ ह्या क्रमांकावर संपर्क करू शकता..

आपला, 
नाना म्हणा हवतर! :)


#Short_story, #marathi_katha, #katha, #story, #from_amod, #amod, #nanavare, #amodnanavare, #marathi-katha, #marathi, #Maay-marathi, #Maaymarthi, #mangya, #breakup, #love, #mangyache_break_up, #short_stories, #marathi, #short_Stories,#Dustbin, #Kachara_Kundi, #India, #Short_Story_Dustbin, #KP_AStrology, Krishnamurthi_Paddhati, #KP, #Home, #Property, #Bhavishya, #Astro_Amod_Nanavare, #Desired_Property, ##My_Home, #Indian_Astrlogy, #Indian_Astro, #Astroloty_India, #Will_get_that_property?

No comments:

Post a Comment