Monday, February 18, 2019

ज्योतिष: नोकरीसाठी परदेश गमन होईल का?


श्री स्वामी समर्थ.

नमस्कार मित्रहो!

नोकरीसाठी परदेश गमन होईल का असा प्रश्न एका महिलेने फोनवर विचारला. आता हे परदेशगमन तेही नोकरी करिता होईल का ते आपण पाहूया.

प्रश्न : नोकरीसाठी परदेशगमन होईल का?
तारीख : १८ फेब्रुवारी २०१९.
वेळ: रात्री ९ वाजून १९ मिनिटे.
स्थळ: वसई (महाराष्ट्र) - ज्योतिषी जिथे असतील ते स्थळ विचारात घ्यावे.

प्रश्न वेळचे तत्कालीन कार्येश ग्रह (Ruling Planet ) खालील प्रमाणे.

लग्न स्वामी : (कन्या) बुध, चंद्र नक्षत्र : (पुष्य) शनी, चंद्र राशी : (कर्क) चंद्र. वार : (सोमवार) चंद्र

प्रश्न लग्न कुंडली

प्रश्न लग्न कुंडलीत चंद्र जरी लाभ स्थानात असला तरी प्रश्न नवमांश कुंडलीत तो भाग्यात म्हणजेच नवम स्थानात आहे. नवम स्थान हे दूरच्या प्रवासासाठी विचारात घ्यावे लागते. दुसरे असे कि चंद्राचा नक्षत्रस्वामी बुध हा प्रश्न लग्न कुंडलीत षष्ठात असून त्याची सातवी दृष्टी व्यय स्थानावर आहे. म्हणजे नक्षत्र स्वामीच्या माध्यमातून चंद्र व्यय स्थान पाहतो. मनातली इच्छा कुंडलीवर अशी प्रतिबिंबित होते. परदेश गमनासाठी व्यय स्थान विचारात घ्यावे लागते. थोडक्यात असे कि प्रश्न बरोबर विचारला आहे. 

परदेश गमन हे व्यय स्थानावरून पाहतात, म्हणजेच परदेश गमनाचे कारक स्थान हे व्यय स्थान असते. परदेशात जाणार म्हणजे तुमच्या सद्य परिस्थितीत अमुलाग्र बदल होणार हे ओघाने आलंच कोणत्याही प्रकारच्या बदलाच, स्ठीत्यन्तराच कारक स्थान म्हणजे तृतीय स्थान. खरे तर स्थानांतर हा शब्द जास्त चपखल वाटो. दुसरे असे कि परदेशात जायचे तर सध्याच्या काळात विमानाला पर्याय नाही. बोटीने तर आपण परदेशात जात नाहीना! तर दूरच्या प्रवासाचे कारक स्थान म्हणजे नवम स्थान विचारात घेणेहि आलंच. म्हणजे असं कि व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर ३, ९ किंवा १२ यापैकी स्थानांचा कार्येश असेल तर परदेश गमन होईल. आता वरील प्रश्न लग्न कुंडलीत तसे आहे का ते पाहू. 

बाराव्या म्हणजेच व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी हा चंद्र आहे. आणि हा आपला चांदोबा बुधाच्या नक्षत्रात आहे. आता दुसरा मुद्दा हा कि प्रश्न लग्न कुंडलीचा महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी कौन है? तर तो बुध (मार्च २०३०) व शुक्र (जून २०१९). महादशा स्वामी बुध कोणाच्या नक्षत्रात आहे? गुरु. अंतर्दशा स्वामी शुक्र  कोणाच्या नक्षत्रात आहे? शनी. आता हे झाले आपले सहकलाकार. चंद्र, बुध, शुक्र, गुरु आणि शनी. हे सर्व कलाकार आपापली भूमिका कशी वठवतात ते पाहूया. त्यासाठी त्याचं कार्येशत्व पाहावे लागेल. 

तर व्यय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र हा तृतीय स्थान (बदल), लाभ स्थान (इच्छापूर्ती) व षष्ठ स्थान (नोकरी) या स्थानांचा कार्येश होतोय. चंद्राचा नक्षत्रस्वामी बुध हा तृतीय (बदल), षष्ठ (नोकरी), नवम (दूरचे प्रवास), दशम (करिअर), लाभ (इच्छापूर्ती), व व्यय (परदेशातील वास्तव्य)  म्हणजे छप्पर फाडके!!! 

दशास्वामी हि बुधच आहे. त्याचा नक्षत्रस्वामी गुरुही शेम टू शेम बुधाप्रमाणेच कार्येश होतो.  बाबौ!!!

अंतर्दशा स्वामी शुक्र २ व ९!! त्याचा नक्षत्रस्वामी शनी २,९,११ याचा सरळ सरळ सरळ अर्थ असा कि जातक जून २०१९ च्या आत परदेशात जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणारच. और पतेकी बात यह है कि, प्रश्न लग्न कुंडलीत तृतीयेश मंगळ व भाग्येश शुक्राचा नव पंचम योग आहे. चतुर्थातल्या शुक्र शनीची दृष्टी दशमावर. दशमेश बुध रविबरोबर षष्ठात शनीच्या तिसर्या दृष्टीत. दशमेश व्यय स्थानाला पाहतो आणि व्ययाधीपती रवी दशमेशाबरोबर. तृतीयातल्या गुरूची लाभातल्या चंद्रावर आणि नवम स्थानावर दृष्टी आहेच. ३,९,१२ याचं तिरकीट चांगलच जमलय .

आणि शेवटच, आपले प्रमुख कलाकार बुध व चंद्र हे लग्न स्वामी व राशी स्वामी म्हणून रुलिंग मध्ये आहेतच. 
सर्व चे सर्व जन मार्गी आहेत. कुनीबी वाकडे (वक्री) न्हाई. 

(हे वाक्य नाकात उच्चारायचे) आता तुम्हास पण काही मार्गदर्शन घ्यायचे असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. माझी कुठेही शाखा नाही आणि मी दुपारी १ ते ४ या वेळेत जागाच असतो. 
७७०९५९४९०२. कसे!!!

आपला (परदेशी जाऊ न शकलेला),

आमोद ननावरे 


No comments:

Post a Comment