Tuesday, September 10, 2019

ज्योतिष : तुमचे जन्म नक्षत्र आणि होणारे आजार व उपाय.

नमस्कार मित्रहो, 

जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याला आयुष्यात कधीच कुठला आजार झाला नाही. आपण सर्वच जण कधी न काही आजारी पडतोच. मग तो आजार कधी साधा सर्दी खोकला किंवा ताप असतो तर कधी एखादा आजार आपल्याला आयुष्यभर साथ करतो. आपल्याला कुठला आजार प्रामुख्याने होणार हे आपल्या कुंडलीत समजतेच. 

जर आपल्याला कुठला आजार प्रामुख्याने होणार आहे हे जर आधीच कळले तर आपण काही उपाय योजना करू शकतो जेणेकरून होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी करता येईल किंवा त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून ठेवता येईल. आपल्या जन्म नक्षत्रा प्रमाणे आपण हे जाणून घेऊ शकतो कि आपल्याला कुठला आजार होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया. 

ज्योतिष शास्त्रात एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी ग्रह मानण्यात येतो. हि २७ नक्षत्र व त्याचा स्वामी पुढील प्रमाणे. 

१) अश्वीनी - केतू
२) भरणी - शुक्र 
३) कृत्तिका - रवी
४) रोहिणी - चंद्र 
५) मृगशीर्ष - मंगळ
६) आर्द्रा - राहू 
७) पुनर्वसू  - गुरु 
८) पुष्य - शनी 
९) आश्लेषा - बुध
१०) मघा - केतू  
११) पूर्वाफाल्गुनी  - शुक्र 
१२) उत्तरा फाल्गुनी - रवी 
१३) हस्त - चंद्र 
१४) चित्र - मंगळ 
१५) स्वाती - राहू 
१६) विशाखा - गुरु 
१७) अनुराधा - शनी 
१८) ज्येष्ठा - बुध
१९) मूळ - केतू 
२०) पूर्वाषाढा - शुक्र 
२१) उत्तराषाढा - रवी 
२२) श्रावण - चंद्र 
२३) धनिष्ठा - मंगळ 
२४) शततारका - राहू 
२५) पूर्वा भाद्रपदा - गुरु 
२६) उत्तरा भाद्रपदा - शनी 
२७) रेवती - बुध 

आता आपण पाहूया कुठल्या नक्षत्रामुळे कुठला आजार होऊ शकतो त्याच बरोबर त्यासाठी उपायही आहेत. 

१) अश्विनी - डोक्याला मार लागणे, वात विकार, अर्धशिशी, पक्षाघात, निद्रा नाश, मेंदूतील रक्तस्त्राव, विस्मृती. उपाय : अश्विनी नक्षत्र ज्यांचे जन्म नक्षत्र आहे त्यांनी भरपूर दान धर्म करावा. गरिबांची, दुःखितांची सेवा करावी.

२) भरणी - कपाळाला इजा होणे, नेत्र विकार, त्वचा विकार, चेहऱ्याला सूज येणे, गुप्तेंद्रियांचे आजार. शीत विकार, मलेरिया, थायरॉईड, टॉन्सिल्सचे विकार. उपाय: गरिबांची सेवा करावी. दान धर्म करावा. 

३) कृत्तिका - तीव्र ज्वर, मलेरिया, मेंदू ज्वर, अग्निभय, रक्तविकार, अग्नी भय, जखमा. उपाय : नक्षत्र देवता मंत्राचा जप करावा. औदुंबराच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी.

४) रोहिणी - गळ्याला सूज, कफ, शीतज्वर, पाय दुखणे, ओटीपोटात दुखणे, शरीराला सूज, रक्तस्त्राव. उपाय: जांभळाच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

५) मृगशीर्ष - चेहऱ्याला सूज, चेहऱ्यावर व्रण, मल - मूत्र अवरोध, सर्दी खोकला, कर्ण विकार. उपाय: ओम सोमाय नमः या मंत्राचा रोज १०८ वेळा जप करावा. 

६) आर्द्रा - गळ्याचे रोग, टॉन्सिल्स, थायरॉईड, दमा, खोकला, कर्णविकार. उपाय: शिव उपासना करावी, पिंपळाची मुळी अभिमंत्रित करून उजव्या दंडावर बांधावी. 

७) पुनर्वसू - न्यूमोनिया,कर्णविकार, फुप्फुसाचे विकार, क्षयरोग, रक्तविकार, कंबर व डोकेदुखी, ब्रॉन्कायटिस. उपाय: रवी पुष्य नक्षत्रावर वेळूच्या झाडाची मुळी घरी आणून अभिमंत्रित करून उजव्या दंडावर बांधावी किंवा जवळ बाळगावी. 

८) पुष्य - क्षय, कॅन्सर, पायोरिया, एक्झिमा, पित्ताशय व श्वसन नलिकेचे रोग. उपाय: पिंपळ वृक्षाची पूजा करावी. पाणी घालावे. ओम अश्वत्थाय नमः या मंत्राचा जप करावा. 

९) आश्लेषा - वात रोग, श्वसन विकार, अपचन, उन्माद, स्नायू दौर्बल्य, कफ रोग. उपाय : ओम सर्पेभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 

१०) मघा - हृदय विकार, पाठीचे दुखणे, मणक्याची झीज,  किडनी स्टोन, मानसिक रोग. उपाय: वादाच्या झाडाचे पूजन करावे. वादाच्या झाडाची पारंबी / मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

११) पूर्वाफाल्गुनी  - गर्भपात, हृदयरोग, रक्तदोष, ऍनिमिया. उपाय: ओम भगाय नमः या मंत्राचा जप करावा. 

१२) उत्तरा फाल्गुनी - पाठदुखी, वात विकार, मानसिक रोग, मानेचे दुखणे, यकृताचे विकार, पित्त ज्वर. उपाय: ओम उत्तरा फाल्गुनीभ्याम नमः या मंत्राचा जप करावा. 

१३) हस्त - उदरवायु, पोटदुखी, आतड्याना सूज, अग्निमान्द्य, स्नायू दौर्बल्य, उन्माद, श्वासरोध. उपाय: ओम सवित्रे  नमः या मंत्राचा जप करावा. 

१४) चित्रा  - पोटात व्रण, पाय दुखणे, मूत्रविकार, किडनी विकार, कंबरदुखी, डोकेदुखी. उपाय: विष्णू उपासना करावी. बेलाच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी.

१५) स्वाती - श्वेतकुष्ट, मूत्ररोग. उपाय: शिव उपासना करावी. 

१६) विशाखा - मधुमेह, फिट्स, चक्कर येणे, मूत्राशय संबंधी विकार. उपाय: नागकेशर अभिमंत्रित करून जवळ बाळगावे.

१७) अनुराधा - रक्तस्त्राव, मूळव्याध, ऍसिडिटी, बद्धकोष्टता.  उपाय : नागकेशर अभिमंत्रित करून जवळ बाळगावे.

१८) ज्येष्ठा - श्वेत प्रदर, मूळव्याध, गुप्तेंद्रियांचे रोग, पित्त विकार, उन्माद. उपाय: ओम इंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. 

१९) मूळ - कंबर दुखी, रक्तदाब, मातीभ्रंश, सायटिका. उपाय : ओम निरुतये नमः या मंत्राचा जप करावा.

२०) पूर्वाषाढा - कंबर दुखी, सायटिका, मधुमेह, श्वासरोग, शीतप्रकोप, रक्तदोष, धातुक्षय. उपाय: ओम अद्वभयो नमः या मंत्राचा जप करावा. 

२१) उत्तराषाढा - सायटिका, त्वचारोग, श्वासरोग, एक्झिमा, श्वेतकुष्ट, अपचन. उपाय: ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 

२२) श्रवण - गुढगेदुखी, त्वचारोग, कोड, क्षय, अतिसार, अपचन. उपाय: ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. 

२३) धनिष्ठा - पायाला जखमा होणे, पंगुत्व, कोरडा खोकला. ओम वसुभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 


२४) शततारका - पायाचे विकार, गजचर्म, कोड, उच्च रक्तदाब. उपाय: ओम वरुणाय नमः या मंत्राचा जप करावा. 

२५) पूर्वा भाद्रपदा - कमी रक्तदाब, घोट्याला सूज येणे, हृदयाचा आकार वाढणे. आम्र वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगणे. 

२६) उत्तरा भाद्रपदा - पायात अस्थिभंग, पायाचे दुखणे, हर्निया, उदरवात, क्षयरोग. उपाय: कडुनिंबाच्या वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

२७) रेवती - पायाचे विकार, तळव्यांची विकृती, पायाला भेगा पडणे, श्रवण दोष. उपाय: पिंपळ वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

तर मित्रहो, जन्म कुंडलीत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र म्हणून जाणावे. तुमच्या जन्मनक्षत्राप्रमाणे तुम्हाला काय आजार होऊ शकतात त्याचा धांडोळा घेऊन त्यासंबंधी उपाय केल्याने निश्चितच लाभ होईल. 

शुभम भवतु.  

ज्योतिषी - श्री आमोद ननावरे, वसई. 
संपर्क - ७७०९५९४९०२.
सशुल्क ज्योतिष मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.

3 comments:

  1. अभिमंत्रित कसे करायचे

    ReplyDelete
  2. मी बऱ्याच जणांना सांगत असतो कीं आपल्या नक्षत्रा प्रमाणे आपले आचार विचार उपाय या नुसार वागले पाहिजे म्हणजे आपल्या जीवनाची अर्धी लढाई जिंकलो (गंमत म्हणून सर्च केलं बरच काही शिखलो धन्यवाद )श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!!!

    ReplyDelete