नमस्कार मित्रहो,
आपण आपली जन्म कुंडली पाहून आपले भविष्य काय आहे हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. आपले ज्योतिर्विद आपल्याला अनेकदा असे सांगतात कि कुंडलीत राज योग आहे. पुष्कर योग आहे, श्रीमंत योग आहे. हा शुभ योग आहे, तो शुभ योग आहे वगैरे, पण असही होते कि त्या योगाची शुभ फळे आपल्याला मिळत नाहीत किंवा अत्यंत नगण्य मिळतात. आणि आपल्याला अनेक मनाविरुद्ध गोष्टींचा बराच काळ सामना करावा लागतो. सांगितलेले शुभयोग आपल्याला का फळत नाहीत याचीही बरीच करणे आहेत. एक म्हणजे ज्या ग्रहांमुळे तो शुभयोग झाला आहे त्या ग्रहाची अवस्था बाल, कुमार, वृद्ध किंवा मृत असेल तर. दुसरे तो ग्रह आपल्या नीच राशीत असेल तर, तिसरे त्या ग्रहावर एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल तर, चौथे तो ग्रह आपल्या शत्रू राशीत असेल तर, पाचवे तो ग्रह पाप ग्रहाच्या युतीत असेल तर, आणखी असे कि तो ग्रह तुमच्या विपत नक्षत्रात असेल तर किंवा प्रत्यरी (शत्रू) नक्षत्रात असेल किंवा वध नक्षत्रात असेल तर असा ग्रह आपल्याला अपेक्षित चांगलं परिणाम ना देता मनस्तापच देतो. उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुमच्या जन्म कुंडलीत शुक्र ग्रह हा वृषभ राशीत लाभ स्थानात आहे म्हणजे जालना पुष्कर योग आणि आता तुम्हाला शुक्राचीच महादशा चालू आहे म्हणजे या योगाचे फळ काय सांगाल? गाडी बंगला पैसे अडका, मन मरातब, छान नोकरी, मॉड छोकरी सर्व ऐहिक सुख पायाशी अगदी लोळण घेतील अशी परिस्थिती असायला हवी ना राव, पण तसे होत नाही. का? कारण तो शुक्र तुमच्या शुभ नक्षत्रात नाही ना. तर हि विपत, प्रत्यारी, वध, नक्षत्र कोणती आहेत हे आता जाणून घेऊया.
त्याआधी नक्षत्रांची नावे त्यांचे स्वामी आणि त्यांचा क्रम लक्षात घ्या.
१) अश्विनी केतू १०) मघा - केतू १९) मूळ - केतू
२) भरणी - शुक्र ११) पूर्वाफाल्गुनी - शुक्र २०) पूर्वाषाढा - शुक्र
३) कृत्तिका - रवी १२) उत्तराफाल्गुनी - रवी २१) उत्तराषाढा - रवी
४) रोहिणी - चन्द्र १३) हस्त - चंद्र २२) श्रवण - चंद्र
५) मृग - मंगळ १४) चित्रा - मंगळ २३) धनिष्ठा - मंगळ
६) आर्द्रा - राहू १५) स्वाती - राहू २४) शततारका - राहू
७) पुनर्वसू - गुरु १६) विशाखा - गुरु २५) पूर्वाभाद्रपदा - गुरु
८) पुष्य - शनी १७) अनुराधा - शनी २६) उत्तराभाद्रपदा - शनी
९) आश्लेषा - बुध १८) ज्येष्ठा - बुध २७) रेवती - बुध
१) जन्म नक्षत्र : आपला जन्म ज्या दिवशी झाला त्यादिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते. आपल्या जन्म नक्षत्रापासून १० वे आणि १९ वे नक्षत्र हे आपणास अशुभ असते. म्हणजे आपल्या कुंडलीत जे ग्रह आपल्या जन्म नक्षत्रापासून १० व्या किंवा १९ व्या नक्षत्रात असतील त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत आपल्याला अशुभ फळे मिळतात. थोडक्यात त्रास होतो. उदाहरण द्यायचे झाले तर तुमच जन्म नक्षत्र जर मृग असेल तर तुमच्या कुंडलीत जे ग्रह चित्रा आणि धनिष्ठा नक्षत्रात आहेत त्यांचण्या दशा अंतर्दशेत त्रास होतो.
2) संपत नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून २ रे, ११ वे आणि २० वे नक्षत्र हे संपत नक्षत्र म्हटले जाते. संपत याचा अर्थ संपत्ती. म्हणजेच आपल्या कुंडलीतील जे ग्रह संपत नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत जातकाला समृद्धी, संपत्ती, आरोग्य इ चा लाभ होतो.
३) विपत नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ३ रे १२ वे आणि २१ वे नक्षत्र हे विपत नक्षत्र म्हटले जाते. विपत याचा अर्थ विपत्ती. संकटे, अडथळे. म्हणजे जे ग्रह विपत नक्षत्रात असतील त्यांच्या दशा अंतर्दशेत आपल्यावर संकटे येतात. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
४) क्षेम नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ४ थे, १३ वे आणि २२ वे नक्षत्र हे क्षेम नक्षत्र म्हटले जाते. क्षेम नक्षत्र हे शुभ नक्षत्र असून जे ग्रह क्षेम नक्षत्रात आहेत त्यांचा दशा अंतर्दशा आपणास शुभ फळ देतात.
५) प्रत्यरी नक्षत्र: आपल्या जन्म नक्षत्रापासून ५ वे, १४ वे आणि २३ वे नक्षत्र हे प्रत्यारी नक्षत्र म्हटले जाते. हे अशुभ फळ दायी असून प्रत्यारी चा अर्थ शत्रू असा होतो. म्हणजे कुंडलीतील जे ग्रह आपल्या प्रत्यारी नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा आपणास त्रासदायक जातात.
६) साधक नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ६ वे, १५ वे आणि २४ वे नक्षत्र हे साधक नक्षत्र म्हटले जाते. हि नक्षत्रे अत्यंत शुभ फलदायी असतात. कुंडलीत जे ग्रह साधक नक्षत्रात आहेत त्यांच्या दशा अंतर्दशा जातकास अत्यंत शुभ फळ देतात. या काळात अनेक नवीन गोष्टी प्राप्त करता येतात.
७) वध नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ७ वे १६ वे आणि २५ वे नक्षत्र हे वध नक्षत्र म्हटले जाते. हे नक्षत्र आपणास अत्यंत पीडा दायक असते. कुंडलीत जे ग्रह वध नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा अत्यंत पीडादायक जातात. म्हणून म्हणतात, लग्न जुळवताना वधू वरांची जन्म नक्षत्रे एकमेकांपासून ७ वि, १६ वि किंवा २५ वि नसावीत त्यामुळे त्यांच्या वैवाहिक सुखात बाधा येते.
८) मित्र नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ८वे, १७ वे आणि २६ वे नक्षत्र हे मित्र नक्षत्र म्हटले जाते. हे एक शुभ नक्षत्र असून कुंडलीत जे ग्रह मित्र नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा शुभ फळ प्रदान करतात.
९) अतीमित्र नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ९ वे, १८ वे आणि २७ वे नक्षत्र हे अति मित्र नक्षत्र म्हटले जाते. हे एक शुभ नक्षत्र असून कुंडलीत जे ग्रह अति मित्र नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा अत्यंत शुभ फळ प्रदान करतात.
तर मित्रहो, शोधून काढा तुमच्या कुंडलीतील कुठली नक्षत्रे हि विपत, प्रत्यारी, वध इ अशुभ प्रकारची आहेत. कोणती नक्षत्रे मित्र, अतीमित्र, संपत इ शुभ प्रकारची आहेत. कोणते ग्रह अशुभ नक्षत्रात आहेत आणि कोणते ग्रह शुभ नक्षत्रात आहेत. आणि पुढे सोपे आहे समजा तुमचा महादशा किंवा विदशा स्वामी जर अशुभ नक्षत्रात असेल तर त्या नक्षत्र देवतेचा मंत्र रोज १०८ वेळा म्हणायचा कि झाली उपासना. आणि त्यातूनच मिळणार आपल्याला आपल्या त्रासातून मुक्ती.
कळावे आपला (नक्षत्र)
श्री. आमोद ननावरे
संपर्क : ७७०९५९४९०२ (व्हाट्स अँप)
No comments:
Post a Comment