बायकोचा तुटपुंजा पगार. पदरात ३
वर्षाची मुलगी आणि आईकडून पैसे घ्यावे लागत असल्याची नामुष्की. गेल्या २
वर्षापासून अभयवर बेकारीची वेळ आलेली. नोकरीचा शोध चालूच होता पण यश येत नव्हते.
अगोदरचा त्याचा अनुभवही तसा चांगला. आय टी कंपनीत नोकरी होती. नवीन नोकरी कधी लागणार
हा प्रश्न, प्रश्न कुंडलीवरून सोडवावा म्हणून मी त्याच्याकडून १ ते २४९ मधला नंबर
मागितला. त्याने नंबर दिला १२९ . १४ मे २०१९ रोजी संध्याकाळी ७:४७ मी. वसई
येथे हा प्रश्न पाहिला. त्या वेळेचे रुलिंग पुढील प्रमाणे होते. लग्न: मंगळ,
नक्षत्र: शुक्र, राशी: बुध, वार: मंगळ
दशमाचा सब शनी शुक्राच्या
नक्षत्रात आणि केतूच्या उप नक्षत्रात आहे. केतु शुक्राच्या नक्षत्रात. शनी, शुक्र
व केतू पुढील प्रमाणे कार्येश होत होते.
शनी – ६,३,१,८,५,४
शुक्र – ३,६,१,८
केतू – ६,३,१,८,२
नोकरी मिळण्यासाठी दशमाचा उप
नक्षत्रस्वामी २,६,१०,११ यापैकी स्थानांचा कार्येश असावा लागतो. वरील उदाहरणात
सहाव्या स्थानाबरोबरच अष्टम स्थानही ‘लागलंय’ म्हणजे नोकरी लागेल पण समाधानकारक
पगार मिळणार नाही.
आता दशास्वामी पाहू.
मे २०२२ पर्यंत रवीची महादशा व
मार्च २०२० पर्यंत शनीची अंतर्दशा चालू असणार आहे. रवी व शनी कशाप्रकारे कार्येश
होतात ते पाहू.
रवी : रवी स्वतः सप्तमात व रवीची
सिंह राशी लाभ स्थानात म्हणून रवी ७ व ११ स्थानाचा कार्येश होतो.
रवीचा नक्षत्र स्वामी – रविच आहे
म्हणून त्याचा उपनक्षत्रस्वामी राहू हा नक्षत्रस्वामी म्हणून गृहीत धरायचा. राहू
पुढील प्रमाणे कार्येश होतो. २,९,३,६,१२,७
राहू स्वतः नवम स्थानात आहे म्हणून
तो नवम स्थानाचा कार्येश होतो. राहू बुधाच्या राशीत आहे म्हणून बुध ज्या स्थानाचा
कार्येश होईल त्या सर्व स्थानाचा राहू कार्येश होईल. बुध सप्तमात आहे व त्याच्या
राशी नवम व व्यय स्थानात आहेत. राहू गुरूच्या नक्षत्रात आहे म्हणून गुरु ज्या
स्थानांचा कार्येश होईल त्या सर्व स्थानांचा राहू कार्येश होईल. गुरु धन स्थानात
आहे व गुरूच्या राशी तृतीय व षष्ठ स्थानात आहे म्हणून राहू २,९,३,६,१२,७ स्थानाचा
कार्येश झाला. राहू मंगळाच्या युतीत आहे म्हणून मंगल ज्या स्थानाचा कार्येश होतो
त्या स्थानांचा देखील राहू कार्येश होईल.
शनी: ६,३,१,८,५,४
म्हणजे नोकरीसाठी आवश्यक षष्ठ
स्थानाचा महादशा व अंतर्दशा स्वामी कार्येश होतात याचा अर्थ रवीच्या महादशेत व
शनीच्या अंतर्दशेत नोकरी लागणारच. आता नोकरी कधी लागणार ते पाहू.
महादशा स्वामीची राशी आणि अंतर्दशा
स्वामीचे नक्षत्र यातून जेव्हा रविचे गोचर भ्रमण होईल तेव्हा घटना घडेल.
रवीच्या राशी – सिंह
शनीच्या राशी – मकर व कुंभ.
रवीची नक्षत्रे: कृत्तिका, उत्तर
फाल्गुनी व उत्तराषाढा
शानिची नक्षत्रे: पुष्य, अनुराधा व
उत्तराभाद्रपदा
कृत्तिका नक्षत्र – २६ अंश ४० कला
ते ३० अंश मेष राशी व ० अंश ते १० अंश पर्यंत वृषभेत.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र – २६ अंश
४० कला ते ३० अंश सिंह राशी व ० अंश ते १० अंश कन्येत.
उत्तराषाढा नक्षत्र –
२६ अंश ४० कला त ३० अंश धनु राशी व ० अंश ते १० अंश मकरेत
पुष्य नक्षत्र – ३ अंश २० कला ते
१६ अंश ४० कला पर्यंत कर्केत.
अनुराधा: ३ अंश २० कला ते १६ अंश
४० कला पर्यंत वृश्चिकेत.
उत्तराभाद्रपदा : ३ अंश २० कला ते
१६ अंश ४० कला पर्यंत मीनेत.
म्हणजे रविचे उत्तराषाढा नक्षत्र व
मकर राशीतून भ्रमण घडेल तेव्हा अभयला नोकरी लागलेली असेल. १४ जानेवारी ते २४
जानेवारी या दरम्यान रवी मकरेत उत्तराषाढा नक्षत्रात असताना हि घटना घडेल. म्हणजे
अजून ७-८ महिने!!! अभय मेटाकुटीला आला होता. माझं मन सांगत होत शनीच्या अंतर्दशेत
नोकरी लागणारच मग शनीची विदशा तरी का अपवाद धरायची? या प्रश्न कुंडलीला शनीची
विदशा २९ मे २०१९ पर्यंत होती. पंचांग पहिले असता समजले रवी वृषभेत (शुक्राच्या
राशीत) रोहिणी या चंद्राच्या नक्षत्रात होता. शिवाय शुक्रही नक्षत्रस्वामी म्हणून
रुलिंग मध्ये होता. म्हणजे रवीने स्वतःचे नक्षत्र पूर्ण भोगून नुकताच चंद्राच्या
नक्षत्रात प्रवेश केला होता.
मी माझा फलादेश दिला – मे महिन्या
अखेर नोकरी लागलेली असेल. व जानेवारी २०२० मध्ये तू नोकरी पुन्हा बदलशील.
आत्ता हा लेख लिहिण्यास कारण
म्हणजे, काही वेळा पूर्वीच अभयचा फोन आला होता. नवीन नोकरीवर रुजू होऊन आज त्याला
साधारण २ महिने झाले होते. मी विचारले, “ म्हणजे तुला मे महिन्यात नोकरी लागली
होती”? तो हो म्हणाला. टू बी प्रिसाईज २८ मे !
मी त्याचे कोरड अभिनंदन केले.
अर्थात त्याने हि न्यूज मला तब्बल २ महिन्यांनी दिली म्हणून. काय करणार दुनियेचा
नियमच आहे गरज सरो वैद्य मरो!
इथे नियमाबरोबरच निरीक्षण महत्वाचे
आहे. घटना घडण्यासाठी रवी चंद्र बरोबरच कारक ग्रहाचे गोचर सुद्धा लक्षात घेणे
महत्वाचे ठरते. रुलिंग मधले ग्रह सुद्धा महत्वाचे ठरतात. महादशा, अंतर्दशा व विदशा
सुद्धा महत्वाच्या ठरतात. नोकरी लागण्यासाठी शनीची अंतर्दशा जर अनुकूल आहे तर
शनीची विदशा सुद्धा अनुकूलच असणार म्हणजे नोकरी लागणे हि घटना पुढील १५ दिवसात
घडणे अपेक्षित आहे अशावेळी चंद्राचे भ्रमण लक्षात घ्यायला हवे. म्हणजे येत्या १५
दिवसात चंद्र जेव्हा शनीच्या राशीत किंवा नक्षत्रात जाईल तेव्हा घटना घडणे
अपेक्षित शिवाय त्याचा नोकरीसारख्या घटनेचा कारक गुरूशी सुद्धा संबंध असणार.
पंचांग पाहिले असता समजले २८ मे २०१९ रोजी चंद्र गुरूच्या पूर्व भाद्रपदा नक्षत्रात
व शनीच्या कुंभ राशीत होता आणि प्रश्न कुंडलीला सुद्धा शनीची अंतर्दशा व विदशा
सुरु होती.
लेखक : ज्योतिषी श्री. आमोद विष्णू
ननावरे, वसई. संपर्क: ७७०९५९४९०२, ८७८८०१३७१४
No comments:
Post a Comment