Tuesday, August 13, 2019

ज्योतिष : ज्योतीर्विदांची युती आणि परदेश गमनाला गती !!!

मुले शिकली, उच्च विद्या विभूषित झाली, छान नोकरीला लागली कि करिअरच्या एका टप्प्यावर त्यांना आणि त्यांच्या पालकांनाही परदेश गमनाचे वेध लागतात. नाशिकचे माझे स्नेही श्री. हेमंतजी रणनवरे म्हणजे एक अत्यंत निष्णात हस्तसामुद्रिक शास्त्री. गेली साधारण २० वर्षे हस्त सामुद्रिक शास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग. त्यांचा आजच सकाळी मला फोन आला. त्यांच्याकडे आलेल्या एका जातकाच्या मुलीला (नाव - आपण तिला प्रिया म्हणूया) बडोद्याला एका चांगल्या फार्मा कंपनीत नोकरी लागली. कामाचे एकूण स्वरूप पाहता परदेशगमनाचेहि चान्सेस होते असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे  होते. हेमन्तजींनी प्रियाच्या दोन्ही तळ हातांचे अभ्यासपूर्वक निरीक्षण करून डिसेंबर महिन्यात म्हणजे या वर्ष अखेरीस ती कार्यालयीन कामाकरिता परदेशात जाईल असा निर्वाळा दिला. हेमंतजींनी प्रियाचे जन्म तपशील मला दिले आणि कुंडलीवरून फलादेश देण्याची आदेशवजा सूचना (प्रेमाची) केली. अर्थात ते माझे स्नेही आणि त्यातून वरिष्ठ (वयाने) असल्याने त्यांची सूचना तत्काळ अमलात आणणे अगत्याचेच नाही का!
हेमंतजींच्या मते प्रियाच्या तळहातावर रवी रेषा चांगलीच डेव्हलप झाली होती. रवी रेषेवर कुठलेही दुषित चिन्ह नव्हते. रवी रेषा हि चांगलीच स्पष्ट होती. ग्रहमालिकेतील रवी हा ग्रह (खगोल शास्त्रच्या दृष्टीने रवी हा तारा असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याला ग्रह मानतात). नोकरीचा कारक, मान सन्मानाचा कारक, अधिकाराचा कारक, आरोग्याचा कारक रवी ग्रह, नोकरीत अधिकार योग असण्यासाठी कुंडलीत रवीची स्थिती बलवान असावी लागते. आणि तळहातावर रवी रेषा अशी स्पष्ट विकसित झाली म्हणजे अशा व्यक्तींचा नोकरीत आणि करिअरमध्ये उत्कर्ष होतो. साधारण वय वर्ष २४ पुढे आणखी ६ महिने या कालावधीत नोकरीचे योग हातावर स्पष्ट दिसत होते. तसेच आयुष्य रेषेवरून विकसित झालेल्या काही ऊर्ध्व रेषाही या  योगांना बळ देणाऱ्या होत्या. प्रवासाचा कारक चंद्र. प्रियाच्या हातावर चंद्राचा उंचवटा हि चांगला विकसित होता. चंद्राच्या उंचवट्यावर प्रवास रेषा चांगलीच डेव्हलप झाल्याची दिसत होती. साडे चोवीस वर्षानंतर ती अधिक क्लीअर दिसत होती. तळहातावर मंगळाचे मैदानही स्पष्ट व कुठल्याही दुषित चीन्हाविना विकसित झालेले होते. मंगळ म्हणजे आक्रमकता, चपळता, धडाडी, पराक्रम, धाडस, नेतृत्व, ठाम निर्णय घेऊन राबविण्याची क्षमता इ गोष्टींचा कारक म्हणजे तळहातावर स्पष्ट दिसत होते कि प्रिया वयाच्या साडे चोवीस वर्षानंतर नोकरीतील कामानिमित्त परदेशात जाणार!!! तो कालावधी ह्या वर्ष अखेरीस येत होता म्हणजे डिसेंबर २०१९ ! आता हाच योग कुंडलीत दिसून येतो का हे पाहण्यासाठी पामराला पाचारण करण्यात आल्याचे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल !! असो. तर प्रियाच्या कुंडलीचे  विश्लेषण करायचे ठरवले. जन्म लग्न कुंडलीत रवी सप्तमेश असून बुधाच्या मिथुन राशीत व मंगळाच्या मृग नक्षत्रात पंचम स्थानात ० अंशावर आहे. तसेच नवमांश कुंडलीत तो भाग्येश असून लाभ स्थानात तूळ (वायू तत्वाची चर राशी)  राशीत आहे. रवी बुधाच्या मिथुन राशीत म्हणजे सम (ना मित्र, ना शत्रू) राशीत. मृग नक्षत्रात म्हणजे मित्र नक्षत्रात. पंचम स्थानात म्हणजे त्याच्या श्रेष्ठ भावात. नवांशात शुक्राच्या तूळ राशीत म्हणजे शत्रू राशीत. त्यात तो विषम राशीत ० अंश २८ कला म्हणजे बाल्यावस्थेत म्हणजे पूर्ण विचारांती रवी बळ यथातथा पण अनुकूल. अगदी उच्च नाही पण मिडल Management पर्यंत नक्कीच पोहोचवेल. आता दुसरा महत्वाचा घटक म्हणजे करिअर चे कारक दशम स्थान व दशमेश. प्रियाच्या दशम स्थानात गुरु (एक नैसर्गिक शुभ ग्रह) जो धनेश व लाभेश आहे. त्यात तो १५ अंश म्हणजे युवावस्था हि एक चांगली गोष्ट. दशमेश मंगळ सप्तमात सिंह राशीत (मित्र राशीत) १६ अंश - युवावस्था हि आणखी एक चांगली गोष्ट, कारण दशमेश व पराक्रमाधिपती मंगळ मित्र राशीत. म्हणजे करिअर मध्ये चांगली प्रगती नक्कीच अपेक्षित. आता महादशा स्वामी राहू तूळेचा भाग्यात व अंतर्दशा स्वामी शनी मीनेचा धनात. त्यातून प्रवासाचा कारक चंद्र व्यय स्थानात म्हणजे परदेश प्रवासाच्या कारक व्यय स्थानात. हि ग्रहस्थिती परदेश प्रवासाला अनुकूल. मूळ कुंडलीत परदेश गमनाचे योग्य आहेत का हे कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे अधिक स्पष्ट होते. व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी केतू २,३,७ व् १० भावांचा कार्येश होतो. केतूचा नक्षत्रस्वामी केतू, म्हणून त्याचा उपनक्षत्रस्वामी गुरु नक्षत्रस्वामीचे कार्य करेल गुरु १,९,१२,२,११ भावांचा कार्येश म्हणजे परदेश गमनाला आवश्यक नवम व व्यय स्थान लागलंय. याचा अर्थ परदेश गमन होणार. महादशा स्वामी राहू देखील नवम वःतृतीय स्थानाचा कार्येश होतोय. तृतीय स्थान बदल दाखवते. नवम स्थान दूरचे प्रवास दाखवते. राहू स्व नक्षत्रात. त्याचा उपनक्षत्र स्वामी गुरु वरील प्रमाणे परदेश गमनाला साहाय्यभूत होतो आहेच. अंतर्दशा स्वामी शनी सुद्धा नवम व व्यय स्थानाचा कार्येश होतो. शनी गुरूच्या नक्षत्रात म्हणजे गुरूचा हि सपोर्ट. शनी मंगळाच्या उपनक्षत्रात मंगळ हि नवम व व्यय स्थान यांचा कार्येश होतो. मंगळ शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र हि ३,९,१२ या स्थानाचा कार्येश आता एवढे सगळे जण प्रियाला परदेशात पाठवणार म्हटल्यावर प्रियाचं विमान या वर्ष अखेरीस उडणारच... अर्थात प्रिया सकट!!!!







ज्योतिषी : आमोद विष्णू ननावरे, वसई - संपर्क : ७७०९५९४९०२, ९८९०७८७५०२ 
ज्योतिषी : हेमंत रणनवरे, नाशिक - संपर्क: ७७२००६६६१८, ९६३७३२३०४१

No comments:

Post a Comment