Saturday, September 26, 2015

दिवाळीची रात्र

दिवाळीची रात्र असूनही नकोशा पावसाची संतत धार लागली होती. दादा, ताई, आई आणि बाबा अशा चौकोनी
कुटुंबात छोटा दादा रुसून बसला होता. "तू मला काबुल केलं होतस, नवीन सायकल आणशील म्हणून". श्रीखंड पुरीचा आवडता बेत असूनही छोट्या दादाला जेवायचच  नव्हत मुळी. आईने समजावलं. अजून दोन महिन्यांनी नाताळच्या सुट्टीत नक्की सायकल घेऊन देईन म्हणून. पण छोटा दादा ऐकायलाच तयार नव्हता. आत्ताच्या आत्ता आणून दे. चौकोनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. छोट्या दादाला कसा समजवावं? आईचा पारा चढू लागला होता. तिचे पेशन्स संपत चालले होते. आणि छोट्या दादाने रडायला सुरुवात केली. आईने पाठीत धपाटा घातला होता. छोट्या दादाने आपल्या इवल्या इवल्या हातांनी आईला मारायला सुरुवात केली. तो हट्टालाच पेटला होता.बाबा शांतपणे खुर्चीत बसून पेपर वाचत होते. माय लेकरांचे भांडण ऐकून त्यांना हि वैताग आला होता. छोटा दादा आता इरेलाच आला होता. आता मात्र बाबांनी पापर बाजूला ठेवला. बाबा आईला रागावले. कारण आईने छोट्या दादाला जोराचा आणखी एक धपाटा घातला होता. "करा. अंक्खी लाड करा. लाडोबा झालाय नुसता. काही म्हणून ऐकायला नको. मर मारून ह्यांच्यासाठी रात्रंदिवस राबायचं. ह्यांना काही नाही त्याचं" आईचा संतापाचा पारा चांगलाच चढला होता. "एवढं कशाला मारायचं"? थोडं दुर्लक्ष कर ना. बाबांनी समजुतीचा सूर लावला. "तुम्हाला शक्य नव्हत तर मग प्रॉमिस का केलात त्याला"? "तुम्हाला नाही, मला भोगायला लागतं सगळं."  "हा मुलगा पण दिवसेनदिवस हाताबाहेर चालला आहे". "आता मला अरियर्स नाही मिळाले त्यात माझा काय दोष"? बाबांना पण वाईट वाटत होतं. एकूणच वातावरण ऐन पावसात सुद्धा गरम झाला होतं. वाद वाढत चालला होता. ताई मात्र खिडकीत बसून बाहेरचा पाउस पाहत होती. तसं तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हत. छपराच्या पन्हाळयातून  पडणारी पाण्याची धार, तिचा होणारा आवाज, जोडीला बेडकांचा रातकिड्यांचा आवाज बाहेरचं वातावरण कुंद झालं होतं. ताई तशी समजूतदार. दादापेक्षा थोडी मोठी. हट्ट न करणारी. मोठ्यांचे ऐकणारी. घरात्य्ल्या अशा वातावरणाला हल्ली ती सरावली होती. तिने स्वतःलाच प्रश्न केला आज दिवाळीच्या दिवशी माझ्या घरातली माणस दुखी का आहेत? आनंदात का नाहीत? अचानक तिला खिडकीतून ४ माणस दिसली.ती वृद्ध होती. कोसळणाऱ्या पावसात तिच्या घराचा आसरा त्यांनी घेतला होता. त्यांनी तिच्या घराचा दरवाजा वाजवला आणि स्वतःची ओळख करून दिली. ते चौघे जन होते. संपत्ती, यश, आरोग्य आणि सुसंवाद. तिच्या बाबांनी त्यांना आत येण्याची विनंती केली. पण. नियम असा होता कि, त्या चौघांपैकी फक्त एक जणच आत येउ शकत होता. आणि त्या चौघांपैकी असा एक जन होता ज्याला जर आत बोलावले तर त्याच्या बरोबर इतर तिघेही आत येउ शकतील. त्यांनी तसे बाबांना सांगितले. बाबाबंना
वाटत होते कि संपत्तीने आत यावे. छ्तोया दादाला वाटत होते कि यश आत यावे. आईची इच्छा होती कि आरोग्य आत यावे. पुन्हा तिघांचा वाद सुरु झाला. प्रत्येकाला असे वाटत होते कि त्यांचा त्यांचा पर्यायच योग्य होता. पण ताईने वेगळा विचार केला. ती म्हणाली, "आपण सुसंवादाला घरात घेऊ". :आज दिवाळी आहे. सणाचा दिवस आहे." बाबांनी ताईचे म्हणणे मान्य केले आणि सुसंवादाला घरात येण्याची विनंती केली. त्याचबरोबर बाकी तिघेही घरात आले. आश्चर्याची गोष्ट होती. चौघांपैकी एक जण म्हणाला, "जर तुमच्या घरात सुसंवाद असेल तर संपत्ती, आरोग्य आणि यश आपोआपच येतील". खंर ना?

No comments:

Post a Comment