चार मेणबत्त्या एक मेकांशी बोलत होत्या. पहिली म्हणाली, “माझ नाव शांती आहे. पण कोणीच मलात्यांच्या र्हदयात तेवत ठेवत नाही. मला गेलंच पाहिजे. माझा काहीच उपयोग नाही.” आणि अत्यंत दुखीअतःकरणाने ती विझली. दुसरी म्हणाली, ” माझ नाव विश्वसनीयता. विश्वास. पण माझाही तसाकाहीच उपयोग नाही. माझी हि तशी अपरिहार्यता राहिली नाही. मला तरी तेवत राहून काय उपयोग?आणि दुसरी हि शांत पणे विझून गेली. तिसरी म्हणाली, माझं नाव प्रेम आहे. आता माझ्यात सुद्धा तेवतराहाण्याच त्राण नाही राहिलं. लोकांना माझं महत्व नाही. लोक आजकाल आपल्या जवळच्या वर सुद्धाप्रेम करायला विसरले आहेत. सगळीकडे स्वार्थ बोकाळलाय. तिसरी सुद्धा विझून गेली. तिन्हीविझलेल्या मेणबत्त्या मधून नैराश्याचा धूर निघत राहिलं. बराच वेळ.
आणि त्या खोलीत एक लहान मुल आलं. अचानक. त्यानं पाहिल. तिन्ही मेणबत्त्या विझल्या होत्या. तेम्हणालं, तुम्ही का विझून गेलात? तुम्ही तिघांनी शेवट पर्यंत तेवत राहायला हवं होत. असं म्हणत ते मुलरडायला लागलं. अरे बाळा, रडू नकोस. मी आहे न अजून. चौथी मेणबत्ती म्हणाली. जी अजून तेवत होती.माझ नाव आशा. मी आहे अजून आपण त्या तिघींना पुन्हा प्रज्वलित करूया. त्या मुलाच्या डोळ्यात एकवेगळाच तेज झळकलं. अतीव आनंदाने त्याने इतर तीन मेंबात्त्याना पुन्हा प्रज्वलित केलं.
म्हणतात ना आशेची ज्योत कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या आयुष्यात सतत तेवत ठेवली तर शांतता, विश्वास, प्रेम आणि आशा आपण जिवंत ठेऊ शकतो. होय ना?
No comments:
Post a Comment