Monday, October 19, 2015

तयारी अंतर्यात्रेची, स्व स्वरूपाच्या शोधाची .

कोणतेही काम जेव्हा आपण हातात घेतो, त्या कामाच्या पूर्तते विषयी एक रूपरेषा आपल्या मनात पक्की असते. आपण प्लान करतो नाही का? शरीर कमवायचे तर त्या साठी व्यायाम करणं आलंच. मग आपण त्यासाठी व्यायाम शाळेत जातो. आपण तपासून बघतो कि व्यायाम करण्याकरिता लागणारी सर्व साहित्य  व्यवस्थित आहेत ना. उत्तम स्वयंपाक करायचा असेल तर विविध पाक कृतीची आपण माहिती करून घेतो. स्वयंपाक करण्याकरिता लागणारी सर्व गोष्टींची जुळवाजुळव करतोच नाही का. थोडक्यात आपण उत्तम तयारी करतो. जेव्हा ते काम पूर्णत्वास जाते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची चव काही आगळीच असेल नाही का. अशीच तय्रारी आपल्याला करायची असते कोणतीही साधना करण्या करिता. कुठली तयारी? तर आपल्या अंतर्मनाची. आपले सद्गुरु तशी तयारी करून घेतातच पण आपल्याला हि पात्र व्हावं लागतं. हा प्रवास तसा जन्मोजन्मीचा असतो. आणि ह्या प्रवासात आपले सद्गुरु आपल्या पाठीशी असतातच पण. कुठला प्रवास हा? कुठला शोध हा? हा प्रवास असतो अनंताचा. मोक्षाप्रत जाण्याचा. हा शोध असतो शिवत्वाचा. स्व सरुपाचा. ईश्वराच्या प्रेमाचा. त्याच्या भक्तीचा. तो दयाघन इतका स्वस्त आहे का? ते परब्रम्ह असे सहज हातात येण्यासारखे आहे का? जन्मो जन्मीची साधना हि प्रसंगी अपुरी पडते. पण निराश होण्याचे करणाच नाही. त्याची ओढच इतकी जबरदस्त असते कि.... आणि तो हि भुकेला असतो हो भक्ताच्या प्रेमाचा भुकेला. भक्ताच्या कायम ऋणात राहणारा. उद्धवच्या घोड्यांना खरारा करणारा. नाथांच्या घरी पाणी भरणारा. जनाबाईचे दळण दळनारा, ...
तर अशा अनंताला गवसणी घालायची तर तयारी हि तशीच हवी नाही का.  कोणतीही साधना करण्यासाठी बहिरंगाच्या तयारीपेक्षा अंतरंगाची तयारी आवश्यक आहे. संत तुकोबा आपल्या गाथे मध्ये म्हणतात .. 
मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण ||
आपले मनच बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण गीतेत उपदेश करताना म्हणतात उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः || ( गीता अध्याय ६-५ )

साधकाने स्वतःच स्वतःचा उद्धार करायला हवा. स्वतःचे अधःपतन होईल असे वागू नये.अध्यात्म  साधनेसाठी, आपण आपल्या मनाला अधिकारी, अनुकूल आणि पात्र बनविले पाहिजे.

हे समर्थ रामदासांनी ‘दासबोधा’त पाचव्या दशकातील नवव्या समासात सांगितलं आहे.

‘‘अवगुणाचा करूनि त्याग। जेणें धरिला संतसंग। तयासी बोलिजे मग। साधक ऐसा।।’’
‘‘अवगुण त्यागी दिवसेंदिवस। करी उत्तम गुणाचा अभ्यास। स्वरूपीं लावी निजध्यास। या नाव साधक।।’’

साधकाने स्वतःचे परखड पणे आत्म परीक्षण करायला हवं. स्वतःचे अवगुण काय आहेत? त्यांचा त्याग करायला हवा. तसा अभ्यास करायला हवा. आणि हे कसं शक्य आहे? संतांची  सज्जनांची संगत करावी. संत सज्जन जर नाही उपलब्ध असतील तर संतांचे वांग्मय, त्यांचे साहित्य वाचावे. अनेक उन्नत साधकांची अध्यात्म वरील पुस्तक वाचावी. अनेक सिद्धांची, सत्पुरुषांची, साधकांची, संतांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचावीत. तुमच्या माहिती करिता काही नावं सुचवित आहे.
परम पुज्य श्री स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) परम पुज्य श्री गजानन महाराज (अक्कलकोट).
परम पुज्य श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज ( माणगाव).
परम पुज्य श्री गजानन महाराज (शेगाव).
परम पुज्य श्री बिडकर महाराज.
परम पुज्य श्री तात महाराज (दादर).
परम पुज्य श्री स्वामी सुत महाराज ( गिरगाव - मुंबई).
परम पुज्य श्री नामदेव महाराज (कोल्हापूर).
परम पुज्य श्री नाना महाराज तराणेकर.
परम पुज्य श्री उपळेकर महाराज.
परम पुज्य श्री बाबा महाराज सहस्त्रबुद्धे.
परम पुज्य श्री दिगंबरदास महाराज ( डेरवण).
परम पुज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (गोंदवले - सातारा).
परम पुज्य श्री कृष्ण सरस्वती महाराज ( कोल्हापूर).
परम पुज्य श्री दत्त महाराज कवीश्वर
परम पुज्य श्री गुळवणी महाराज
परम पुज्य श्री गगनगिरी महाराज 
परम पुज्य श्री क्षीरसागर महाराज (नगर).
परम पुज्य श्री अण्णा बुवा महाराज (मिरज).
परम पुज्य श्री निर्मालानंद महाराज (मिरज).
परम पुज्य श्री अण्णा महाराज (वाई).
परम पुज्य श्री शंकर महाराज ( धनकवडी - पुणे).
परम पुज्य श्री स्वरूपानंद महाराज ( पावस - रत्नागिरी).
परम पुज्य श्री साटम महाराज ( दानोली).
परम पुज्य श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर ( बाळेकुंद्री).
परम पुज्य श्री काडसिद्धेश्वर महाराज.
परम पुज्य श्री श्रीधर स्वामी महाराज.
परम पुज्य श्री गुरुदेव रानडे.
परम पुज्य श्री अम्बुराव महाराज ( निम्बर्गी ).
परम पुज्य श्री पुज्य बाबा तथा के वि बेलसरे.

परम पुज्य श्री वामनराव पै.
परम पुज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले.
परम पुज्य श्री राम कृष्ण परमहंस (दक्षिणेश्वर - बंगाल ).
परम पुज्य श्री नित्यानंद स्वामी (वज्रेश्वरी).
परम पुज्य श्री मुक्तानंद स्वामी (वज्रेश्वरी).
परम पुज्य स्वामी विवेकानंद.
परम पुज्य श्री एम.
परम पुज्य श्री परमहंस योगानंद ..
परम पुज्य श्री लाहिरी महाशय.
जे कृष्णमुर्ती.
श्रीमती विमल ठकार.
श्री रमण महर्षी.
श्री ओशो.
श्री योगी अरविंद. 
गुरु परंपरा हि अशी अनादी अनंत आहे. समुद्र भरला आहे.. आपण ठरवायचे किती घ्यायचे ते .

श्री समर्थ रामदास स्वामींचा  - दासबोध, श्री संत तुकारम महाराजांची गाथा आणि अभंगवाणी, श्री संत ज्ञानेश्वर माऊलिचे - ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, श्री संत एकनाथ महाराजांचे भागवत. हे तर महाराष्ट्राचे वेदच. ज्याने ह्या पैकी एक हि ग्रंथ उभ्या आयुष्यात वाचला नसेल त्याचा जन्म वाया गेला म्हणेन मी.

आणि ह्या वाटेवरती एकदा वाटचाल सुरु केली कि आवश्यक गुणांचे हि अवलोकन करावे आणि ते गुण आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. वरील संतांच्या ग्रंथांमधून ह्या सर्वांचा उल्लेख आलेला आहेच तसेच त्याबाबतीत पतंजली ऋषींची योगसूत्रे हि नक्कीच वाचनीय आहेत.

काय आहे हि अध्यात्मिक गुण संपदा?
क्षमा, तितिक्षा, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा, अमानित्व, साक्षीभाव, शरणागत  / समर्पण भाव, निष्ठा,
सेवा, त्याग, शम, दम, उपरती, श्रद्धा, नित्यानित्य विवेक (तारतम्य), वैराग्य, गुरु सहवास, सत्य,
ब्रह्मचर्य, शौच, संतोष, तप,  स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान... आणि अनन्य भक्ती.


शिवाय परम पुज्य सद्गुरु वामनराव पै नि सुद्धा म्हटलेच आहे - तूच अहेश तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ..

ह्याच अध्यात्मिक गुण संपदेची  आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या लेखात. तो पर्यंत .. लागुया तयारीला.

|| हरी ओम ||

No comments:

Post a Comment