"अगं, माझा चष्मा कुठे गेला?"
"इथेच तर ठेवला होता."
"तुला किती वेळा सांगितलं, हा पेला असा भरून ठेऊ नकोस, पडला बघ"
"अगं, पुसून तरी घे लवकर."
"पेपर सुद्धा कसा चोळामोळा करून टाकला आहेस तो "
"नीट करून ठेव पहिला."
"अगं आईग, हा गुढगा मेला आताच दुखायला हवा होता."
भिंतीवरचे रंगाचे पोपडे निघून आले होते. त्यावरचे जुने घड्याळ अजून अंगावर गतकाळच्या खुणा वागवत चालू होते. संध्याकाळचे ६ वाजले होते. साठीला आलेले माधव राव चष्म्याच्या शोध मोहिमेवर होते. आराम खुर्चीतून उठतानाच गुडघ्याने असहकार पुकारला. चष्मा नसेल तर पेपर कसा वाचणार? चष्मा नसेल तर टीव्ही कसा पाहणार? चष्मा नसेल तर खिडकीतून कोणी आलं गेलं कसे कळणार? अशातच पार्वती काकू, त्यांच्या सौभाग्यवती. त्यांनी भरून ठेवलेला पाण्याचा पेला लवंडला. पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याची एक विचित्र आकृती फरशीवर तयार झाली होती. माधव रावांना चष्मा अजून सापडत नव्हता.
"आले आले आले !!!"
"अहो काय हे? काय आरडा ओरडा लावलाय? "
"जरा मेला धीर नाही निघत तुम्हाला."
"कोणी सांगितली होती नसती उठाठेव करायला?"
"सांडलं ना पाणी!"
"हजार वेळा पेले भरून ठेवा, हजार वेळा पेपर नीट करा, हे उचलून ठेव, ते नीट कर."
"घरात जस काही ४ नोकर आहेत"
"कंटाळा आला आता."
"घ्या. हा इथे ठेवलाय चष्मा, फोन जवळ."
"हजार वेळा सांगितलं, इथे तिथे ठेवत जाऊ नका वस्तू, तुम्ही उद्योग करून ठेवता आणि निस्तरावे लागते मला."
पार्वती काकूंनी आपल्या सात्विक संतापाला वाट करून दिली. काकूंची एके ४७ एव्हाना सुरु झाली होती. माधव रावांनी शांत पणे जवळचे रिमोट उचलले आणि टीव्ही लावला. एके ४७ ची एक फैरी संपली होती. अक्टोबरचा महिना. दिवस कलला होता. प्रचंड उकडत होत. पंख्याचा वारा सुद्धा गरम लागत होता. संध्याकाळ अंगावर आली होती. टीव्ही वरच्या बातम्या सुद्धा तेच तेच दळण चालू होत.
कुठल्याशा सोसायटीत म्हणे, सुरक्षा रक्षकाने एका वृद्ध जोडप्याचा खून ................... माधव रावांच्या मनात कालवा कालव झाली. कपाळावरची शीर तट तटून आली. घामाचा एक ओहोळ कपाळावरून खाली ओघळला. घशाला कोरड पडली. जवळच्या पेल्यातले पाणी त्यांनी एका घोटात संपवले. झालेला बदल काकुनी ओळखला होता. काकू माधव रावांच्या जवळ गेल्या. मोठ्या मायेने त्यांनी आपला हात माधव रावांच्या डोक्यावरून हळुवार पणे फिरवला. त्यांच्या हातातला पेला घेत त्या शांत पणे म्हणाल्या.
"कशाला पाहता अशा अभद्र बातम्या?"
"किती वेळा सांगितलं, चागले वाचा. चांगले सिनेमे पहा. छान फिरायला जाऊया. ऐकतच नाही तुम्ही "
माधवरावांना आता थोड शांत वाटत होते. अवचित आलेल्या अश्रुना त्यांनी वाट करून दिली. काकुनी आपल्या पदराने त्यांचे डोळे पुसले.
खिडकी समोरचा रस्ता लांबवर पसरला होता. कोपर्यावरच्या चिंचेची पान गळून गेली होती. ओकबोकं झालेलं चिंचेच झाड आपल्या असंख्य निष्पर्ण फांद्यांना सांभाळत संध्याकाळच्या कातरवेळी केवीलवाण उभं होत. वाहनांची वर्दळ, येणारे जाणारे पादचारी, गीऱ्हायीकाशी घासाघीस करणारे दुकानदार. सोसायटीच्या गेट मधून येणारे जाणारे लोक. अरे! हे काय? गेटमधून ४ वर्षाची छोटी विभा धावत येत होती. छान फ्रिलचा गुलाबी फ्रोक. गळ्यात मोत्यांची माळ, काळे बूट. दुडूदुडू धावत तिने मोठ्याने हाक मारली आबा !!! आपल्या गोड नातीला बघून माधवरावांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तुकतुकी आली. पाठोपाठ तुषार आणि तनया हि चालत आले. हातात किती त्या पिशव्या. चेहऱ्यावर उत्साह. मुलगा आणि सुनेच्या येण्याने माधवराव खुशीत आले.. दरवाजा उघडण्यासाठी ते वळले. दारावरची बेल वाजली. माधवरावांनी दार उघडले. दारात सोसायटीचा सुरक्षा रक्षक उभा होता. त्याने कसलेसे बिल त्यांच्या हातात दिले. माधवरावांनी थोडे बाहेर येत आजूबाजूला पाहिले, शेजारच्या जोशींचा मुलगा आणि सून त्यांच्या छोट्या मुलीसह त्यांच्या कडे आले होते. डोक्यावर पंखा ५ वर चालू होता. माधवरावांनी दार लाऊन घेतलं. कडी नीट लाऊन घेतल्याची खात्री केली. देवघरात पार्वती काकू डोळे मिटून बसल्या होत्या. जपमाळ संथ पणे त्यांच्या हातातून फिरत होती. देवाजवळचा दिवा मंदपणे तेवत होता. उदबत्तीचा मंद सुगंध भरून राहिला होता. श्री राम जय राम जय जय राम | श्री राम जय राम जय राम | माधवराव वळले पेल्यातल्या पाण्याचा एक घोट त्यांनी घेतला. ओलावलेले डोळे पुसले. आणि ड्रोव्हर मधून अल्बम काढला. ३ वर्षापूर्वी कॅनडात गेलेल्या त्यांच्या लेकाने फोटो पाठवले होते काही दिवसापूर्वी. अल्बम उघडला. फोटोचे एक एक पान ते उलटत होते. एक एक करत सर्व फोटो संपले होते. अल्बम मधली रिकामी पान बराच वेळ माधवराव उलटत राहिले. माधवरावांचा कंठ उगाचच दाटून आला. बराच वेळ देवघरातून काकूंचा आवाज येत राहिला. श्री राम जय राम जय जय राम | श्री राम जय राम जय राम |
#katti, #Don't_talk,#talk, #child, #small_child, #netorious,#Madhavrao, #Parvatikaku, #Album, Katha_Album,
#Short_story, #marathi_katha, #katha, #story, #from_amod, #amod, #nanavare, #amodnanavare, #marathi-katha, #marathi, #Maay-marathi, #Maaymarthi, #mangya, #breakup, #love, #mangyache_break_up, #short_stories, #marathi, #short_Stories,#Dustbin, #Kachara_Kundi, #India, #Short_Story_Dustbin, #KP_Astrology, Krishnamurthi_Paddhati, #KP, #Home, #Property, #Bhavishya, #Astro_Amod_Nanavare, #Desired_Property, ##My_Home, #Indian_Astrlogy, #Indian_Astro, #Astroloty_India, #Will_get_that_property?, #When_will_the_Light_resume, #Electricity, #lait_kadhi_yeil?, #apekshit_batami, #Expected_news, #news, #When_will_I_get_the_expected_news?,

No comments:
Post a Comment