Wednesday, October 28, 2015

डोकं जरा थंड ठेवा म्हटलं !!!


)
"सुधा काकू."
सायलीने घरातूनच हाक मारली.
"आज रात्री सगळ्यांनी टेरेसवर कोजागिरी साजरी करायची आहे. तुम्ही येणार ना?"
सोसायटीतल्या सगळ्या बायका थोडे पैसे जमउन रात्री टेरेस वर कोजागिरी साजरी करणार असल्याचा निरोप सायलीने समोरच्या विंग मधला सुधा काकुना दिला.
"कधी ठरले? कधी झाली मीटिंग? मला का नाही बोलावले? "
"मी काही नाही येणार"
नुकताच वाळत घालायचा कपडा जोराने झटकत काकुनी दोरीवर वाळत घातला आणि आत निघुन गेल्या.
वास्तविक काही मीटिंग अशी झालीच नव्हती. सगळ्याजणी पैकी एक दोघींनी पुढाकार घेऊन ठरवलं होत आणि आवश्यकता भासल्यास मिटिंग घेणारही होत्या. त्यात सुधा काकू ह्या चौथ्या मजल्यावर राहतात. वय साधारण ६० च्या आसपास. त्यांच्या विंगला लिफ्टही नाही. म्हणून काही ठरण्या अगोदरच जर निरोप द्यावा म्हणून सायली ने निरोप दिला शिवाय कशाला काकुनी एवढे माजले उतरा चढा.

)
मिलिंदने त्याच्या इकोनोमिक्स च्या नोट्स वीणाला द्यायच्या कबूल केल्या होत्या. दोघेही अत्यंत जवळचे मित्र. वीणा तर त्याची जीवश्च कंठश्च मैत्रीण, पण मिलिंदने त्या नोट्स परस्पर निधीला दिल्या कारण तिची क्लास मध्ये दुसर्या दिवशी परीक्षा होती. मिलिंदच्या मते निधीला त्याची जास्त गरज होती. दिवस झाले मिलिंद आणि वीणा एकमेकांशी बोलत नाही आहेत.

)
निकम आणि साटम सोसायटीच्या कमिटीवर खजिनदार आणि सचिव म्हणून काम पाहतात. दोघांमध्ये खूप चांगल जमत अस सोसायटीतील इतर लोकांना वाटत.
"हलो! साटम. मी आलोय घरी. तुम्ही कुठे पोहोचलात?"
निकमना कमिटी मिटिंग घ्यायची होती. त्यामुळे दोघांचे एकत्र बसून काही महत्वाचे बोलणे भात होते. निकम आज जर लवकरच कामाहून घरी आले होते. आल्या आल्याच सौ. निकमनि त्यांना वन समान आणण्याकरिता बाहेर जायला सांगितले होते. पण साटम बरोबर असून महत्वाचे बोलायचे असल्यमुळे निकमनि ती सूचना धुडकाऊन लावली होती.
" मी पोचलोय बोरीवली पर्यंत, एक तास लागेल घरी पोचायला"
"बराय, घरी आलात कि फोन करा मी वाट बघतो."
दोघांचा असा संवाद झाला.
निकम बराच वेळ घरी वाट पाहत राहिले. साटम आलेच नाहीत
रात्री अमळ उशिरा निकम यांनी फोन केला.
"हेलो, आलात का घरी"
"हो"
"कधी आलात"
" एक तास झाला"
"मग फोन का नाही केलात?"
"मी खूप दमलोय, उद्या भेटू. गुड नाईट"
जवळपास महिने झाले सोसायटीची कमिटी मिटिंग नाही झालेली.
निकम आणि साटम दोघेही एकमेकांना भेटले नाहीत.

)
सकाळचे वाजले होते. अरुणला कशी काय पण आज जर लवकरच जाग आली.
डोळे चोळत आणि जांभय देत तो निलूच्या रुममध्ये आला. निलू अजून छान आणि गाढ झोपली होती. मस्त उठावं  आणि गरमागरम चहा घ्यावा म्हणून अरुणने चहाचे आधण स्टोव्हवर ठेवले. दात घासले आणि निलूला उठवायला गेला. छान एकत्र चहा घेऊन भल्या सकाळी फिरायला जावे असे अरुणला वाटत होते. झालं भलतंच, निलू भलतीच करवादली. झोपेतून उठवले म्हणून अरुणाला नाही नाही ते बोलली. आज काळ अरुण एकटाच जातो फिरायला. बऱ्याच अशा काही घटना घडल्या आहेत कि दोघांनी डिवोर्स फ़ाइल केलाय. 


मनाच्या खोल तळाशी कुठेतरी सतत काळजी वास करत असते. विवंचना, चिंता, घोर, हुरहूर हे काही समानार्थी शब्द. कळत नाही कधी कधी कसली चिंता, कसली काळजी. सतत एका प्रकारचे भय पाठलाग करत राहते. असुरक्षितता, अस्थैर्य, सुटलेली कोडी, सुटलेले प्रश्न, राग, उद्वेग, संताप, अपमान, काही कारणाने मनाचा तळ ढवळला गेला कि हे सर्व उसळून वर येत. जर हातात पैसा असेल तर जीव निरनिराळ्या व्यसनामध्ये आपले सुख शोधतो. जिथे मिळेल तिथे, जसं मिळेल तसं सुख ओरबाडून घेतो. सत्ता असेल तर दुसर्याची पिळवणूक करण्यात जीवाला आसुरी आनंद मिळतो. विकृत आनंद मिळतो. आणि ह्या चक्रात तो वाहत जातो अजून कर्म निर्माण होत राहते. संचित जमा होत राहते आणि कर्म भोग अटळ होतात. पुण्याई संपली कि भोग भोगावे लागतात. नियतीचा फेरा अतर्क्य असतो. सुखाच्या कल्पना हि वेगवेगळ्या असतात. सुखाच्या आड येणाऱ्या व्यक्ती  किंवा परिस्थिती आपल्याला खल नायक वाटतात. आपण त्याचा पूर्ण बिमोड करण्याचा प्रयत्न करतो. तसं करता येत नसेल तर आपण त्या व्यक्ती किंवा परिस्थिती पासून पळ काढतो. एक तर त्यातून भीती निर्माण होते. दहशत निर्माण होते आणि आपण हतबल होतो. निराश होतो. हे जे होणे आहे एका मनस्थितीतून दुसर्या मनस्थितीत जाणे, मी आत्ता आनंदात आहे. माझ्या बॉसने मला सुट्टी नाकारली. मला त्याचा राग आला. त्याच्या बाबतीत घडलेल्या सर्व अप्रिय घटनांच्या स्मृती पुन्हा मनाच्या काठावर आल्या. राग आणखी वाढला. मी बॉसला अद्वातद्वा बोललो. मी काय केलं? मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वाभाविक प्रतिक्रिया.इथे माझे मनस्थिती बदलली. आपण काय करायला हवं? सर्व काही अवलंबून आहे आपल्या प्रतिक्रियेवर. जशी आपली प्रतिक्रिया तसा त्याचा परिणाम. नातेसंबंध जोपासताना, आपलं स्वतःशी सुद्धा एक नात असतं.  आपण आपल्या प्रतिक्रियांकडे जाणीव पूर्वक लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्यावर विचार करू तेव्हा तसा विचार करण्याची सवय आपल्याला लागेल. आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्या अगोदर हि प्रक्रिया आपल्या मनात पार पडली पाहिजे. म्हणतात ना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ मग काय सगळ साध्य होईल. पण इथे आपल्या आतल्या संघर्षाचे काय? स्वतःचाच स्वतःशी जो संघर्ष चालू आहे त्याचे काय? इथे साक्षी भाव कामाला येतो. स्वतःच्या विचारंकडे त्रयस्थ सारखं पाहणे. विचार येतात आणि जातात. जे बदलण्यासारखे नाही ते बदलण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला? म्हणून म्हणतात ना जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. कसं? अभ्यास. साधना. सद्ग्रंथांचे वाचन. सत्पुरुषांचा सहवास. सद्विचारांचे चिंतन आणि मनन. नाम स्मरण. नामाचे अनुसंधान. ध्यान आणि संपूर्ण शरणागती. कठीण आहे पण अशक्य नाही. बघा विचार करा!



No comments:

Post a Comment